IND vs NZ 1st Test Kanpur : मुंबईकर श्रेयस अय्यर याने कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. पदार्पणात शतक झळकावणारा अय्यर 16 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी, विरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, रोहित शर्मा यांनी पदार्पणात शतक झळकावलं होतं. कानपूर कसोटीत श्रेयस अय्यर याने 13 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने शतकी खेळी साकारली आहे.


अय्यरच्या शतकी खेळीनं भारत सुस्थितीत -
कानपूरमध्ये न्यूझीलंडविरोधात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं (Indian Cricket Team) चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसाखेर भारताने दिलासादायक सुरुवात करत 4 विकेट्सच्या बदल्यात 258 धावा केल्या आहेत. शुभमन, श्रेयस आणि जाडेजा यांच्या अर्धशतकांमुळे भारत सुस्थितीत होता. पहिल्या दिवशी नाबाद असणारा जाडेजा दुसऱ्या दिवशी लगेच बाद झालाय. अय्यरने नाबाद राहत आपलं शतक पूर्ण केलं आहे. एका बाजूने विकेट्स पडच असताना दुसऱ्या बाजूला अय्यरने संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरलाय. जाडेजापाठोपाठ साहानेही विकेट टाकली. सध्या अय्यर आणि अश्विन मैदानावर आहेत.  सहा गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघ 305 धावांपर्यंत पोहचला आहे. अय्यर 105 धावांवर तर अश्विन 16 धावांवर खेळत आहेत.


श्रेयसचा पदार्पणातच धमाका


श्रेय्यस अय्यरनं 2017 मध्ये भारताकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं श्रीलंकाविरुद्ध धर्मशाला येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.  श्रेयस अय्यरनं काल कसोटीमध्ये पदार्पण केलं.  पहिल्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावलं असून सध्या तो 136 चेंडूत 75 धावांवर खेळत आहे. त्याच्याकडे पदार्पणाच्या कसोटीत शतक करत इतिहास रचला आहे.  


या भारतीयांनी ठोकलंय पदार्पणाच्या कसोटीत शतक - 
लाला अमरनाथ, दीपक शोधन, एजी कृपाल सिंह, अब्बास अली बैग, हनुमंत सिंह, गुंडाप्पा विश्वनाथ, सुरिंदर अमरनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, प्रवीण आमरे, सौरव गांगुली, विरेंद्र सहवाग, सुरेश रैना, शिखर धवन, रोहित शर्मा या खेळाडूंनी आपल्या पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.


अय्यरवर कौतुकांचा वर्षाव - 
पदार्पणात कसोटी शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यर याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आजी-माजी खेळाडूंसह नेटकऱ्यांनी अय्यरच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे.  ट्वीटर, फेसबूक, कूसह इतर सोशल मीडियावर अय्यर याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.