IND vs BAN : भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना, कसा आहे आजवरचा इतिहास, मैदानाची स्थिती? वाचा सविस्तर
IND vs BAN ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर आता कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर रंगणार आहे.
IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात आता कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. वन डे मालिका गमावल्यामुळे भारत आता कसोटी मालिका जिंकून किमान दौऱ्यातून काहीतरी आनंदाची बातमी भारतीय चाहत्यांना देऊ इच्छित आहे. त्यात कसोटी मालिका ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीनं महत्त्वाची आहे. भारताला आपले उर्वरीत कसोटी सामने जिंकणं WTC फायनलमध्ये एन्ट्रीसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आजचा सामनाही भारतासाठी महत्त्वाचा आहे. तर या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.
सामना होणाऱ्या चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम आहे. याच मैदानावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ईशाननं द्विशतक तर कोहलीनं शतक ठोकलं. त्यामुळे कसोटी सामन्यात काय कमाल दोन्ही संघाचे फलंदाज करतील हे पाहावं लागेल. बांगलादेशातील इतर कोणत्याही विकेटप्रमाणेच, ही खेळपट्टी देखील फिरकीपटूंना जास्त फायदा देणारी आहे.
कसा आहे आजवरचा इतिहास?
भारतीय संघ कसोटी सामन्यात 9 वेळा बांगलादेशसमोर (India vs bangladesh) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियानं (Team India) एकहाती आपली पकड बांगलादेशवर ठेवत 11 पैकी 9 सामने जिंकले आहेत. तर दोन सामना अनिर्णीत राहिल आहेत. त्यामुळे बांगलादेशनं आजवर एकही कसोटी विजय भारतावर मिळवलेला नाही. पण एकदिवसीय मालिका बांगलादेशनं 2-1 ने जिंकल्यानं आता या कसोटी मालिकेत काय होणार? हे पाहावं लागेल.
भारताचा कसोटी संघ:
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.
बांगलादेश संघ:
शकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन, इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.
कसं आहे कसोटी मालिकेचं वेळापत्रक?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताला 2-1 नं पराभवाचा सामना करावा लागला.
हे देखील वाचा-