IND vs ENG, 5th Test : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध 416 धावांची खेळी केली आहे. या खेळीमध्ये पंत आणि जाडेजा यांनी ठोकलेली शतकं अत्यंत महत्त्वपूर्ण असून कर्णधार बुमराहनेही 31 धावांची केलेली खेळी वाखाणण्याजोगी आहे. कसोटी सामन्यात एका षटकात ठोकण्यात आलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. त्यामुळे बुमराहच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड झाला असून सोशल मीडियावर त्याचं बरचं कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे बुमराहने ही कामगिरी इंग्लंडच्या स्टुवर्ट ब्रॉडविरुद्ध केली असून 2007 मध्ये युवराजनेही याच गोलंदाजाविरुद्ध टी20 सामन्यात सहा षटकार ठोकत 36 धावा केल्या होत्या. त्यामुळे या खेळीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा तुफान पाऊस पडत आहे. सचिनने बुमराहचा फोटो पोस्ट करत 'हा युवराज आहे की बुमराह?' असा मिश्किल सवाल विचारत 2007 ची आठवण आली असंही म्हणाला आहे.
कशी होती ओव्हर?
भारताच्या डावातील 84 व्या षटकात बुमराहने पहिल्या चेंडूपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉल वाईडच्या दिशेने जात चौकार गेला. मग तिसरा चेंडू नो बॉल होता ज्यावर बुमराहने षटकार उडवला. मग सलग तीन चौकार ठोकल्यावर पाचव्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर अखेरच्या चेंडूवरही बुमराहने एक धाव घेतली. ज्यामुळे कसोटी सामन्यातील एका षटकात 35 धावा ठोकण्याचा विक्रम बुमराहने केला आहे. या ओव्हरमध्ये बुमराहने केलेल्या फटकेबाजीचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा-