IND vs ENG, 5th Test : अत्यंत खराब सुरुवात झालेल्या भारताने तब्बल 416 धावा पहिल्या डावात स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. ही कमाल केली आहे, ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजाच्या दमदार शतकांनी. एकीकडे पंतने त्याच्या अंदाजात टेस्टमध्ये केलेली टी20 स्टाईल फलंदाजी तर जाडेजाची संयमी खेळी यानेच भारताचा डाव खऱ्या अर्थाने सांभाळला. यावेळी भारताचा कर्णधार आणि मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नाबाद 31 धावांची फिनिशींग केल्यामुळे भारताची धावसंख्या 400 पार गेली. 

सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानुसार इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारताचे सर्व आघाडीचे फलंदाज एक-एक करत तंबूत परतले. सलामीवीर गिल, पुजारा स्वस्तात बाद झाले. मग कोहली, विहारी आणि श्रेयस अय्यर यांनीही लगेचच पॅव्हेलियनचा रस्ता धरला. 100 धावांच्या आत भारताचे पाच फलंदाज बाद झाले होते. त्याचवेळी उपकर्णधार ऋषभ पंतने स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजाच्या मदतीने भारताचा डाव सावरला. पंत आणि जाडेजाने यांनी सहाव्या गड्यासाठी 222 धावांची दमदार भागिदारी केली. त्यानंतर दोघांनी आपआपली शतकं पूर्ण केली असून पंतने 146 तर जाडेजाने 104 धावा केल्या. त्यानंतर शमीने 16 धावा केल्या असून कर्णधार बुमराहने 16 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकत नाबाद 31 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 416 धावा पहिल्या डावात केल्या आहे. ज्यानंतर आचता इंग्लंडचे फलंदाज पहिला डाव खेळत आहेत.

पहिल्या दिवशी भारताची फलंदाजी -

फलंदाजी धावा चेंडू चौकार षटकार
शुभमन गिल  17 24 4 0
चेतेश्वर पुजारा  13 46 2 0
हनुमा विहारी  20 53 1 0
विराट कोहली  11 19 2 0
ॠषभ पंत  146 111 19 4
श्रेयस अय्यर  15 11 3 0
रवींद्र जडेजा 104 194 13 0
शार्दुल ठाकूर  1 12 0 0
मोहम्मद शमी  16 31 3 0
मोहम्मद सिराज 2 6 0 0
जसप्रीत बुमराह (नाबाद) 31 16 4 2

इंग्लंडची गोलंदाजी 

गोलंदाजी षटकं निर्धाव षटकं धावा विकेट
जेम्स अँडरसन 21.5 4 60 5
स्टुअर्ट ब्रॉड 18 3 89 1
मॅथ्यू पॉट्स 20 1 105 2
जॅक लीच 9 0 71 0
बेन स्टोक्स 13 0 47 1
जो रूट 3 0 23 1

हे देखील वाचा-