Jasprit Bumrah to Stuart Broad : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज स्टुवर्ट ब्रॉडच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. ब्रॉडला जसप्रीत बुमराहने एका षटकात तब्बल 35 धावा ठोकल्या आहेत. कसोटी क्रिकेटमधील ही सर्वात महागडी ओव्हर ठरली आहे. विशेष म्हणजे टी20 क्रिकेटमधील सर्वात महागडी 36 धावांची ओव्हरही ब्रॉडच्याच नावावर आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहने 2007 साली या 36 धावा ठोकल्याने भारताविरुद्ध ब्रॉडचं नशिबचं खराब आहे की काय? अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारताने पहिल्या डावात तब्बल 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजाच्या दमदार शतकाच्या जोरावर ही धावसंख्या भारताने केली असून यावेळी भारताचा कर्णधार आणि मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह याने देखील नाबाद 31 धावांची दमदार फिनिशींग केली. भारताच्या डावातील 84 व्या षटकात बुमराहने पहिल्या चेंडूपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉल वाईडच्या दिशेने जात चौकार गेला. मग तिसरा चेंडू नो बॉल होता ज्यावर बुमराहने षटकार उडवला. मग सलग तीन चौकार ठोकल्यावर पाचव्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर अखेरच्या चेंडूवरही बुमराहने एक धाव घेतली. ज्यामुळे कसोटी सामन्यातील एका षटकात 35 धावा खाण्याची नामुष्की ब्रॉडच्या नशिबी आली. याआधी सर्वात महागडं षटक हे 28 धावाचं होतं.

कसोटी सामन्यातील सर्वात महागडी षटकं

फलंदाज गोलंदाज धावा सामना
जसप्रीत बुमराह स्टुवर्ट ब्रॉड 35 भारत विरुद्ध इंग्लंड (2022)
ब्रायन लारा आर पीटरसन 28 वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2003)
जी बेली जेम्स अँडरसन 28 ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (2013)
केशव महाराज जो रुट 28 दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (2020)

हे देखील वाचा-