IND vs ENG Score Live: इंग्लंडकडून भारताचा 7 गडी राखून पराभव, मालिकाही सुटली अनिर्णीत

IND vs ENG : भारताच्या मागील इंग्लंड दौऱ्यातील उर्वरीत पाचवा कसोटी सामन्याला आजपासून इंग्लंडच्या बर्मिंगहम येथे सुरुवात होत आहे.

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 05 Jul 2022 05:04 PM

पार्श्वभूमी

India vs England Test :  भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आजपासून कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. इंग्लंडमधील बर्मिगहम येथे या सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. यावेळी भारतीय कर्णधार रोहित...More

ENG vs IND: अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा एकहाती विजय

बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात विजय मिळवून इतिहास रचण्यासाठी भारताकडून संधी हुकली. या सामन्यातील अखेरच्या दिवशी भारतानं दिलेल्या 378 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघानं एकहाती विजय मिळवला आहे. इंग्लंडच्या विजयानंतर मालिका 2-2 नं बरोबरीत सुटली.