WBBL News : ऑस्ट्रेलियात मॅचदरम्यान राडा! एक डाव झाल्यानंतर खेळपट्टीवर अचानक आले खड्डे, हाय-व्होल्टेज सामना रद्द, नेमकं काय घडलं?
क्रिकेट सामने रद्द होण्याचे मुख्य कारण पाऊस हे असते, तर काही सामने सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीच्या खराब परिस्थितीमुळेही रद्द होतात.

WBBL Match Adelaide Strikers and Hobart Hurricanes : क्रिकेट सामने रद्द होण्याचे मुख्य कारण पाऊस हे असते, तर काही सामने सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीच्या खराब परिस्थितीमुळेही रद्द होतात. पण, डावाच्या ब्रेक दरम्यान अचानक खेळपट्टी खराब झाल्यामुळे सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला बिग बॅश लीगच्या चालू हंगामात अॅडलेड स्ट्रायकर्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. डावाच्या ब्रेक दरम्यान खेळपट्टीवर खड्डे पडल्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
डावाच्या ब्रेक दरम्यान खेळपट्टीवर पडले खड्डे अन्...
दक्षिण ऑस्ट्रेलियातील करेन रोल्टन ओव्हल स्टेडियमवर महिला बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील सामना सुरू होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अॅडलेड स्ट्रायकर्सने 20 षटकांत 4 गडी गमावून 167 धावा केल्या. त्यानंतर, डावाच्या ब्रेक दरम्यान, खेळपट्टी रोल होत असताना, अचानक एक चेंडू रोलरखाली आला, ज्यामुळे खेळपट्टीवर मोठा खड्डा पडला. WBBL नियमांनुसार, डावाच्या ब्रेक दरम्यान खेळपट्टी रोल केली जाते. या सामन्यादरम्यान, एक चेंडू चुकून रोलर खाली आला आणि तो अडकला, ज्यामुळे खड्डा पडला.
सामना रद्द
परिणामी, खेळपट्टीच्या परिस्थितीत लक्षणीय बदल झाला. सामनाधिकारी आणि पंचांमधील सल्लामसलतनंतर, हरिकेनसाठी स्ट्रायकर्सने अनुभवलेल्या परिस्थितीपेक्षा लक्षणीयरीत्या वेगळ्या परिस्थितीत फलंदाजी करणे अयोग्य मानले गेले. अधिकाऱ्यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांशी बोलून त्यांनी निर्णय मान्य केला.
As a result, pitch conditions were changed significantly.
— Weber Women's Big Bash League (@WBBL) December 5, 2025
After consultation, it was considered unreasonable to expect Hobart to bat in conditions that were materially different to those the Strikers had.
Both captains were consulted and accepted the decision. (2/2) #WBBL11 pic.twitter.com/Bs7rFDV2fe
अॅडलेड स्ट्रायकर्सचे विधान
खेळपट्टीतील खड्डयामुळे सामना रद्द झाल्यानंतर, अॅडलेड स्ट्रायकर्सने एक निवेदन जारी केले. ज्यामध्ये असे म्हटले होते की, खेळपट्टीची स्थिती लक्षणीयरीत्या बदलली आहे. सामनाधिकारी आणि पंचांमध्ये झालेल्या चर्चेनंतर असे निश्चित करण्यात आले की अॅडलेड स्ट्रायकर्सच्या फलंदाजीनंतर निर्माण झालेल्या खड्यामुळे खेळपट्टीचे वर्तन बदललेल्या परिस्थितीत हरिकेन्सकडून फलंदाजी करण्याची अपेक्षा करणे अयोग्य ठरेल. सामनाधिकाऱ्यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांशी सल्लामसलत केली आणि त्यांनी सामना रद्द करण्याच्या निर्णयाशी सहमती दर्शविली. सामना रद्द झाल्यानंतर, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर, स्ट्रायकर्सने 20 षटकांत चार गडी गमावून 167 धावा केल्या. डावाची सुरुवात करणाऱ्या मॅडेलीन पेनाने तिच्या संघासाठी सर्वाधिक नाबाद 63 धावा केल्या, तर ब्रिजेट पॅटरसनने फक्त 12 चेंडूत 24 धावा देऊन दमदार कामगिरी केली. नॅट सायव्हर-ब्रंटने चांगली गोलंदाजी केली, तिच्या चार षटकांत फक्त 22 धावा दिल्या आणि एक बळी घेतला.
हे ही वाचा -
IND vs SA 3rd ODI Live Score : टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला; रोहित-विराट बदला घेणार? थोड्याच वेळात नाणेफेक, जाणून घ्या सर्वकाही





















