एक्स्प्लोर

ICC World Cup 2027 : आयपीएल  सुरु असतानाच 2027 च्या वनडे वर्ल्ड कपबाबत मोठी अपडेट, तीन देश आयोजन करणार

ICC World Cup : 2023 च्या वर्ल्ड कपचं आयोजनं भारतात करण्यात आलं होतं. आता आयपीएल सुरु असतानाच 2027 च्या  वर्ल्ड कपबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली: भारतासह जगभरात आयपीएलची (IPL 2024) धुम सुरु  आहे. आयपीएलचं  17 वं पर्व सुरु असतानाच आयसीसीच्या वतीनं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं मोठी घोषणा केली आहे. 2027 चा वनडे वर्ल्ड कप (World Cup) कुठं आयोजित केला जाणार आहे या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आयसीसीच्या निर्णयानुसार 2027 ला वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात  आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा तीन देश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बॉब्वे हे वर्ल्डकपचं आयोजन करण्यात येणार आहे.  

दक्षिण आफ्रिकेतील आठ मैदानावर या स्पर्धेतील मॅच खेळवल्या जातील. भारतात गेल्यावर्षी झालेल्या वर्ल्ड कपला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आयसीसीचा वर्ल्ड कप आणखी रोमांचकारी बनवण्याचा प्रयत्न आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वेनं यापूर्वी वर्ल्ड कपचं  आयोजन केलेलं आहे. तर, नामिबिया पहिल्यांदा वर्ल्ड कपचं आयोजन करणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वेनं यापूर्वी 2003 वर्ल्ड कपचं आयोजनं केलं होतं. 

दक्षिण आफ्रिकेत कोणत्या मैदानावर मॅचेस होणार ?

दक्षिण आफ्रिकेत 2027 च्या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे.दक्षिण आफ्रिकेतील 8 मैदानांवर मॅचेसचं आयोजन केलं जाणार आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियम, प्रिटोरियामध्ये सेंच्युरियन पार्क, दर्बनमधील किंग्समीड,सेंट जॉर्ज पार्क, सुपरस्पोर्ट पार्क, न्यूलँड्स स्टेडियम, बफेलो पार्क आणि द मांगुआंग ओवलची निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे सीईओ फोलेत्सी मोसेकी यांनी याबाबत घोषणा केली आहे. हा निर्णय हॉटेलच्या खोल्या, विमानतळांची सुविधा या गोष्टींचा विचार करुन घेण्यात आला आहे. आमच्याकडे आयसीसीची मान्यता असलेली 11 मैदानां आहेत. अनेक विषयांचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं ते म्हणाले.  

दरम्यान, 2027 च्या टी वर्ल्ड कपचे आयोजक असल्यानं दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वे हे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तिसरा आयोजक देश नामिबियाला मात्र आफ्रिकेतील पात्रता फेरीत चांगली कामगिरी करत स्पर्धेत सहभागी व्हावं लागेल. आयसीसी रँकिंग्जमध्ये पहिल्या आठ स्थानावर असलेल्या संघांना वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळतो. 

2003 मध्ये काय घडलेलं?

2003 च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या  वर्ल्ड कपमध्ये भारतानं चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारतासमोर अंतिम फेरीतील लढतीत ऑस्ट्रेलियाचं आव्हानं होतं. ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकला होता. तर, बरोबर 20 वर्षांनी आस्ट्रेलियानं फायनलमध्ये भारताला पुन्हा एकदा पराभूत केलं होतं. 

संबंधित बातम्या :

IPL 2024, RR vs GT : आरसीबीविरुद्ध शतक, शुभमन गिलचा बटलरसाठी विशेष प्लॅन, राशिदच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गेम 

 IPL 2024, RR vs GT : राजस्थानचा पलटवार, सॅमसन अन् परागनं शुभमनचा खेळ बिघडवला, गुजरातसमोर किती धावांचं आव्हान?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget