एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 : टीम इंडियाला मोठा झटका, दुखापतीमुळे शिखर धवन विश्वचषकातून बाहेर

ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलाचा उसळता चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता.

लंडन : विश्वचषकातच भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावं लागलं आहे. आधी तीन आठवड्यांसाठी शिखर धवन भारतीय संघाबाहेर असेल, असं सांगण्यात आलं होतं, मात्र दुखापत गंभीर असल्याने धवनला संपूर्ण विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी रिषभ पंतला संघात कायमस्वरुपी स्थान मिळाले आहे. धवनच्या जागी आता केएल राहुल टीम इंडियाकडून डावाची सुरुवात करणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सचा उसळता चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता. मात्र अतिशय वेदना होत असतानाही तो खेळत राहिला. या सामन्यात धवनने 109 चेंडून 117 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या सामन्यात दुखापतीमुळे शिखर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाने संपूर्ण 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं होतं. त्यानंतर नॉटिंग्घममध्ये झालेल्या स्कॅनमध्ये धवनच्या बोटात फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र अजूनही ही दुखापत भरुन न निघाल्याने शिखर संपूर्ण विश्वचषकातच खेळू शकणार नाही. शिखर धवनने आयसीसीच्या टूर्नामेंट्समध्ये शानदार कामगिरी केली आहे. शिखर धवनने 2015 च्या विश्वचषकात 51.50 च्या सरासरीने 412 धावा केल्या आहे, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (2013-2017) मध्येही धवनची कामगिरी चांगली होती. त्याने 77.88 च्या सरासरीने तीन शतकांच्या मदतीने 701 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात देखील शिखरने ऑस्ट्रेलियाविरुध्द 117 धावांची करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. भुवनेश्वर कुमारही दुखापतीमुळे दोन ते तीन सामन्यातून बाहेर भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील दुखापतीमुळे पुढील दोन ते तीन सामन्यातून बाहेर झाला आहे. पाकिस्तान विरुद्ध रविवारी (16 जून) झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला होता. दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला मैदान सोडावं लागलं होतं. मैदान सोडण्यापूर्वी त्याने केवळ 2 षटकं आणि चार चेंडू एवढीच गोलंदाजी केली होती. अफगाणिस्तान (22 जून) आणि वेस्ट इंडिजविरुद्ध (27 जून) होणाऱ्या सामन्यासाठी भुवनेश्वर अंतिम 11 खेळाडूंमध्ये नसेल. तसंच 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्या समावेशाबाबत साशंकता आहे, अशी माहिती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली होती. संबंधित बातम्या ICC World Cup 2019 : शिखर धवनला पर्याय कुणाचा? ऋषभ पंतला संधी मिळणार? ICC World Cup 2019 : विश्वचषकात टीम इंडियाला झटका, शिखर धवन तीन आठवड्यांसाठी बाहेर ICC World Cup 2019 : हम परों से नहीं हौंसलों से उड़ते हैं, दुखापतीनंतर धवनचं ट्वीट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget