ICC Women's World Cup 2022: महिला विश्वचषक 2022 च्या (Womens World Cup 2022) 15 व्या सामन्यात भारतीय महिला संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावा लागले. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं भारताला 4 विकेट्स आणि 112 चेंडू राखून भारताला पराभवाची धुळ चाखली. तर, बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून वेस्ट इंडीजच्या संघानं भारताच्या जखमेवर मीठ चोळलंय. वेस्ट इंडीजच्या विजयामुळं आयसीसी महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. या बदलामुळं भारताचा सेमीफायनल गाठण्याचा मार्ग खडतर झाला आहे. 


दरम्यान, वेस्ट इंडीजच्या विजयामुळं भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. बांगलादेशला पराभूत करून वेस्ट इंडीजच्या संघानं आयसीसी विश्वचषकातील तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. ज्यामुळं त्यांचे सहा गुण झाले आहेत. या गुणतालिकेत भारत चार गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. य


वेस्ट इंडिजच्या महिला संघाने वर्ल्ड कपमध्ये तीन विजय मिळवले असून गुणतालिकेत ते सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. भारतीय संघाचे चार गुण आहेत. गुणतालिकेत भारताच्या क्रमवारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. भारत चौथ्या नंबरवर आहे. बांग्लादेशनं हा सामना जिंकला असता, तर वेस्ट इंडिजचे फक्त चार गुण राहिले असते. अशा परिस्थिती भारत तिसऱ्या स्थानावरच राहिला असता.


आयसीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी चार-चार सामने जिंकले आहेत. त्यानंतर न्यूझीलंडचा (4 गुण) पाचव्या क्रमांकावर, इग्लंड (4 गुण) सहाव्या क्रमांकावर, बांगलादेश (2 गुण) सातव्या आणि या विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणारा पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या संघाला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. 


इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेपैकी एका संघावर विजय मिळवून बांग्लादेशवर मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha