IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वीच लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडलाय. त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध गेल्या आठवड्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने लखनौ फ्रँचायझीला वुडच्या दुखापतीबद्दल माहिती दिलीय.
आयपीएल 2018 मध्ये वूड फक्त एकच सामना खेळला. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचा एक भाग होता. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये लखनौच्या संघानं त्याला 7.50 कोटीत खरेदी केलं होतं. जगातील सर्वोत्कृष्ट मर्यादित षटकांच्या गोलंदाजांमध्ये मार्क वूडची गणना केली जाते. मार्क वूड लखनौच्या संघात सामील झाल्यानंतर चाहत्यांना खूप आनंद झाला होता. दरम्यान, मार्क वूडच्या जागेवर फ्रँचायझीकडं निवडण्यासाठी काही पर्याय आहेत. मात्र, अद्याप कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही.
लखनौ सुपर जायंटसचे शिलेदार-
लोकेश राहुल (17 कोटी), मार्कस स्टॉईनिस (9.2 कोटी), रवी बिष्णोई (4 कोटी), क्विन्टॉन डी कॉक (6.75 कोटी), मनिष पांडे (4.60 कोटी), जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हूडा (5.75 कोटी), कृणाल पंड्या (8.25 कोटी), मार्क वूड (7.50 कोटी), आवेश खान (10 कोटी), अंकित राजपूत (50 लाख), के. गौतम (90 लाख), दुष्मन्ता चमिरा (2 कोटी), शाहबाज नदीम (50 लाख), मनन व्होरा (20 लाख), मोहसीन खान (20 लाख), आयुष बदोनी (20 लाख), करण शर्मा (20 लाख).
हे देखील वाचा-
- Holi 2022: सचिन तेंडुलकर यांच्याकडून चाहत्यांना होळीच्या खास शुभेच्छा
- IPL 2022: पांड्या बंधू वेगवेगळ्या फ्रेंचायझीसाठी खेळणार; कृणालच्या पत्नीच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टनं आणलं चाहत्यांच्या डोळ्यात पाणी
- KKR New Jersey: नवा कर्णधार, नवा लूक! कोलकात्याचा संघ आता नव्या जर्सीत उतरणार मैदानात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha