ICC Womens World Cup 2022: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकच्या 17 व्या सामन्यादरम्यान मैदानावर एक धक्कादायक घटना घडली. बांगलादेश विरुद्ध सामन्यात वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज शमिलिया कॉनेल (Shamilia Connell) मैदानात कोसळली. ज्यामुळं तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिचं अचानक मैदानात पडण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बांगलादेशच्या डावाच्या 47व्या षटकात क्षेत्ररक्षण करत असताना ती खाली पडली. त्यानंतर वेस्ट इंडीजचे सर्व खेळाडू तिच्या दिशेनं धावल्या. 


बांगलादेशचा संघ फलंदाजी करत असताना 47 व्या षटकात शमिलिया कॉनेल हिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोस्ळली. कॉनेल जमिनीवर पडल्यानंतर पंचांनी खेळ थांबवला आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बोलावलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे पाहून मैदानातील प्रेक्षकही आश्चर्यचकीत झाले.


वेस्ट इंडीजचा बांगलादेशवर 4 धावांनी विजय
या सामन्यात नाणेफेक गमावून वेस्ट इंडीजचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. स्टेफनी कॅम्पबेलनं नाबाद अर्धशतकी खेळी केली. मात्र, तरीही वेस्ट इंडीजच्या संघानं 50 षटकात 9 विकेट्स गमावून 140 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाला अखेरच्या षटकात 8 धावांची गरज होती. परंतु, बांगलादेशनं 9 विकेट्स गमावले होते. ज्यामुळं हा सामना रोमहर्षक ठरला. या सामन्यातील 49.3 चेंडूवर बांग्लादेशची के रामहरक रन आऊट झाली. ज्यामुळं वेस्ट इंडीजच्या संघानं हा सामना 4 धावांनी जिंकला.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha