ICC Ranking : टीम इंडियाने श्रीलंकेला टेस्ट सीरीजमध्ये 2-0 ने मात दिली. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने महत्त्वाची कामगिरी केली. त्याच्या या शानदार गोलंदाजीमुळे त्याला नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. बुमराह आयसीसीच्या टेस्ट गोलंदजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आल आहे. त्याने सहा स्थानांची मोठी उडी घेतली आहे. तर श्रीलंकेचा फलंदाज दिमुथ करुणारत्ने यालाही फायदा झाला असून तो देखील थेट पांचव्या स्थानावर पोहोचला आहे.


जसप्रीत बुमराहने श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत 10 विकेट्स मिळवले. दोन सामन्यात त्याने ही कामगिरी केल्याने त्याला रँकिंगमध्ये हा फायदा झाला आहे. बुमराहसोबत दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन आश्विन हा देखील या यादीत दुसऱ्या स्थानावर कायम राहिला आहे. आश्विनकडे सध्या 850 पॉईंट्स असून बुमराह 830 पॉईंट्सने स्थानावर आहे. या यादीत 892 पॉईंट्ससह पॅट कमिन्स पहिल्या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रीकेचा कागीसो रबाडा 835 पॉईंट्ससह तिसऱ्या नंबरवर आहे.



फलंदाजीत विराटची घसरण


श्रीलंकेचा खेळाडू दिमुथ करुणारत्ने रँकिंगमध्ये तीन स्थानांच्या फायद्यासह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे विराट कोहलीला मोठा तोटा झाला आहे. तो चार स्थानांनी घसरुन थेट नवव्या स्थानावर पोहोचला आहे. ऋषभ पंत 10 व्या स्थानावर तर कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानावर कायम आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha