Australia Tour of Pakistan: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. याठिकाणी टेस्ट मालिकेनंतर दोन्ही संघ वनडे सीरीज आणि एक टी20 सामनाही खेळणार आहेत. वनडे आणि टी20 सामने रावळपिंडीमध्ये खेळले जाणार होते. पण आता या सामन्यांचे ठिकाण बदलून लाहोर करण्यात आले आहे. पाकिस्तानचे मंत्री शेख राशिद अहमद यांनी राजकीय तणावामुळे का निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.


न्यूज एजेन्सी एएफपीने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या एका मंत्र्यानोे सांगितले की, इस्लामाबादमध्ये सध्या राजकीय तणावाचं वातावरण आहे त्यामुळे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे आणि टी20 सामने रावळपिंडीतून लाहोरला शिफ्ट करण्यात आले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही. सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने ड्रॉ झाले आहेत. आता तिसरा आणि अखेरचा सामना 21 मार्चपासून खेळवला जाणार आहे. त्यानंतर वनडे सीरीज 29 मार्चपासून सुरु होणार आहे. ज्यानंतर एकमेव टी20 सामना 5 एप्रिलला खेळवला जाणार आहे.


या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा यांची कामगिरी आतापर्यंत शानदार सुरु आहे. सर्वाधिक धावांमध्ये तो अव्वल क्रमांकावर आहे. ख्वाजाने 2 कसोटी सामन्यात 301 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या इमाम उल हकने 2 सामन्यात 289 रन करत तो दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने दुसरा सामना ड्रॉ करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. त्याने 425 चेंडूत 196 धावांची अप्रतिम खेळी केली. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha