ICC Women's World Cup 2022: 11 नव्हेतर इतक्या खेळाडूंसह संघाला मैदानात उतरता येणार, आयसीसीचा नवा नियम
ICC Women's World Cup 2022: न्यूझीलंडमध्ये खेळण्यात येणाऱ्या आयसीसी एकदिवसीय महिला विश्वचषकाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं मोठा निर्णय घेतलाय.
न्यूझीलंडमध्ये खेळण्यात येणाऱ्या आयसीसी एकदिवसीय महिला विश्वचषकाबाबत (ICC Women's Cricket World Cup 2022) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) मोठा निर्णय घेतलाय. त्यानुसार, ज्या संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर, तो संघ नऊ खेळाडूसह मैदानात उतरू शकतो, असं आयससीनं गुरुवारी म्हटलं आहे. आयसीसीने संघांना पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच यानंतर सामना टाय झाल्यानंतर निकाल लागू पर्यंत सुपर ओव्हर खेळलं जाणार आहे.
आयसीसी आधिकारी क्रिस टेटलीनं म्हटलं आहे. कोरोनाच्या परिस्थिती लक्षात घेऊन खेळाचे व्यवस्थापन केलं जात आहे. तसेच अधिकृतपणे एका संघात 15 खेळाडू असतील. परंतु, त्यांच्यासह अनेक खेळाडूंना सोबत आणलं जाऊ शकतं. ज्या खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल, त्यांच्या जागेवर या खेळाडूंना खेळवलं जाईल.
येत्या 4 मार्चपासून एकदिवसीय महिला विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. तर, 3 एप्रिलला क्राईस्टचर्च येथे विश्वचषकातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत आठ संघ प्रतिस्पर्धी संघाशी एक-एक सामना खेळणार आहे. यापैकी चार संघ सेमीफायनलमध्ये धडक देतील. "जर आवश्यक किंवा शक्य झाल्यास सामना रीशेड्यूल करू. तसेच एखादा सामना टाय झाल्यास निकाल लागूपर्यंत सुपर ओव्हर खेळली जाईल. याआधी सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर दोन्ही संघानं किती चौके मारले? यावर निकाल अवलंबून राहायचा. परंतु, विश्वचषकात तसं काही होणार नाही", असं टेटलीनं म्हटलं आहे.
हे देखील वाचा-
- IPL Mega Auction 2022: इंग्लंडच्या 'या' 11 खेळाडूंना फ्रँचायझींनी घेतलं विकत, लियाम लिव्हिंगस्टोनला मिळाली सर्वात मोठी रक्कम
- IND vs SL, 1st T20 Live Streaming: भारत- श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना आज; कधी, कुठे आणि कसा पाहायचा?
- Punjab Kings Captain: मयंक अग्रवाल पंजाबचा नवा कर्णधार? लवकरच घोषणा होणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha