एक्स्प्लोर

भारतीय संघाने युगांडाचा केला 326 धावांनी पराभव, लागोपाठ तिसऱ्या विजयासह क्वार्टरफाइनलमध्ये धडक

IND vs UGA : भारताचा अंडर 19 संघाने लागोपाठ तिसरा विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाचं पुढील फेरीतील तिकिट पक्कं झाले आहे.

Ind U19 vs Uganda U19 : भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाने वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत (ICC U-19 World Cup) धमाकेदार प्रदर्शन कायम ठेवलं आहे. भारतीय संघाने युगांडाचा 326 धावांनी दारुण पराभव केला आहे. भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. या विराट विजयासह भारतीय संघाने क्वार्टरफाइनलमध्ये धडक मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धिरित 50 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 405 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना युगांडाचा संघ 19.4 षटकांत फक्त 79 धावा करु शकला. युगांडा संघाच्या नऊ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. कर्णधार Pascal Murungi याचा अपवाद वगळता एकाही युगांडाच्या फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. भारतीय संघाकडून निशांत सिंधू याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. 

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना  भारताने तब्बल 405 धावा स्कोरबोर्डवर लावत कमाल केली. यामध्ये अंगकृष रघुवंशी (Angkrish Raghuwanshi) आणि राज बावा (Raj Bawa) यांनी अप्रतिम शतकं लगावली आहेत. याआधी भारताने अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत 2004 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 425 रन केले होते. सामन्यात नाणेफेक जिंकत युगांडा संघाने गोलंदाजी घेतली. इथेच त्याच्यांकडून मोठी चूक झाली कारण भारतीय संघाने याच गोष्टीचा फायदा उचलत धमाकेदार फलंदाजी केली. हरनूर सिंग, निशांत संधू प्रत्येकी 15 धावा करुन बाद झाले. पण अंगकृष आणि राज बावा यांनी डाव सांभाळत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. यामध्ये अंगकृष याने 144 धावा केल्या. त्याने 120 चेंडूत 22 चौकार आणि चार षटकार लगावले. तर राज याने तब्बल 162 नाबाद धावा केल्या. त्याने 108 चेंडूत 14 चौकार आणि आठ षटकार ठोकले.

राजने तोडला शिखरचा रेकॉर्ड

राज याने नाबाद 162 धावा करत भारतीय फलंजाज शिखर धवनचा 17 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला आहे. शिखरने 2004 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 155 धावा केल्या होत्या. अंडर 19 विश्वचषकातील ही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget