ICC Media Rights: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अलीकडेच पुढील 5 वर्षांसाठी त्यांच्या आयपीएल मीडिया अधिकारांचा लिलाव केला. या लिलावातून बीसीसीआयनं 48 हजार कोटींपेक्षा अधिक पैशांची कमाई केली. बीसीसीआयनंतर आता आयसीसी मीडिया हक्कांच्या लिलावाची तयारी केलीय. आयसीसीनं येत्या 20 जून रोजी पहिला टेंडर घोषित करण्याचा निर्णय घेतलाय. 


पहिल्यांदाच आयसीसी महिला आणि पुरुष स्पर्धांचे मीडिया हक्क स्वतंत्रपणे विकण्याची तयारी करत आहे. आयसीसीद्वारा मीडिया हक्कांसाठी काढला जाणार पहिला टेंडर फक्त भारतीय बाजारपेठेसाठी असेल. ज्यामध्ये 6 पॅकेज असणार आहेत. टीव्ही आणि डिजिटल हक्कांसाठी एक पॅकेज असणार आहे. पहिल्यांदाच आयसीसी महिला आणि पुरुष स्पर्धांचे मीडिया हक्क स्वतंत्रपणे विकण्याची तयारी करत आहे. प्रसारकांनी पुढील आठवर्षांसाठी पुरुष आणि चार वर्ष महिला स्पर्धांसाठी बोली लावू शकतात.


दरम्यान, आयसीसी मीडिया हक्क सामन्यांची एकूण संख्या 362 (पुरुष) आणि 103 (महिला) झालीय. मीडिया हक्कांसाठी पहिल्या चार वर्षांकरीताही बोली लावू शकतात. त्यांच्याकडे 8 वर्षांच्या भागीदारीचाही पर्याय उपलब्ध असेल, असं आयसीसीनं जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केलंय. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेट जागतिक स्तरावर सातत्याने प्रेक्षक गोळा करत आहे आणि त्यामुळेच अनेक प्रसारक आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांची आवड दाखवतात. आमचे एक अब्जाहून अधिक चाहते आहेत ज्यांना ते जागतिक स्तरावर पाहायला आवडते आणि त्यांचे आवडते खेळाडू जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यांमध्ये खेळताना पाहण्यास आवडतील, असंही आयसीसीनं निवेदनात म्हटलंय. 


गेल्या काही वर्षांमध्ये महिला क्रिकेटच्या प्रेक्षकांमध्येही वाढ झाली आहे, याच्या पार्श्वभूमीवर आम्ही या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. त्याचे प्रसारण हक्क स्वतंत्रपणे विकण्याची तयारी करत आहोत. महत्त्वाचे म्हणजे, मीडिया अधिकारांसाठी आसीसीद्वारे सादर करायच्या टेंडरबाबत सप्टेंबर 2022 मध्ये आयसीसी बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. उर्वरित बाजारासाठी नंतर प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती आयसीसीनं दिलीय. 


हे देखील वाचा-