IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतानं पुढील दोन सामन्यात विजय मिळून जोरदार कमबॅक केलंय. या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्डेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकेवर नाव कोरेल. विशेष म्हणजे, या मालिकेत भारताचं नेतृत्व करणाऱ्या ऋषभ पंतनं चारही सामन्यात नाणेफेक गमावलंय. यामुळं पुढच्या सामन्यात तो उजव्या हातानं नाणेफेक करणार असल्याचं त्यानं गंमतीनं म्हटलंय.

ऋषभ पंत काय म्हणाला?"दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यात आम्ही ज्या रणनीतीनं मैदानात उतरलो, ती यशस्वी ठरली आणि निकाल आमच्या बाजूनं लागला. या सामन्यात दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्यानं चांगली कामगिरी करून दाखवली. आता बंगळुरुमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाचव्या टी-20 सामन्यात आम्ही 100 टक्के देण्याचा प्रयत्न करू". तसेच पुढच्या सामन्यात मी उजव्या हातानं नाणेफेक करणार असल्याचंही ऋषभनं गंमतीनं म्हटलंय. 

ट्वीट-

भारताचा 82 धावांनी विजयया सामन्यातही दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकलं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सुरुवातीपासूनच ठराविक अंतरानं विकेट्स गमावणं सुरूच ठेवलं. दक्षिण आफ्रिकेकडून रासी व्हॅन डेर डुसेननं सर्वाधिक 20 धावा केल्या. आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 87 धावांत ऑलआऊट झाला आणि भारतानं हा सामना 82 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला.

तब्बल 16 वर्षानंतर दिनेश कार्तिकचं टी-20 मध्ये अर्धशतककार्तिक भारताच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचा (1 डिसेंबर 2006) भाग होता. त्यानं जोहान्सबर्गमध्येच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्यामध्ये त्यानं 28 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली होती. पण 16 वर्षांनंतर कार्तिकने पहिले आणि सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या 26 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कार्तिकनं 27 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त होता.

हे देखील वाचा-