Zaheer Khan Picks Team India For T20 WC: सध्या आयपीएल 2024 चा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलमध्ये भारतासह अनेक विदेशी खेळाडू जोरदार कामगिरी करत आहेत. आयपीएलचा हंगाम संपताच  आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ( T20 WC 2024) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. 1 जूनला अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. 


भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि 2011 च्या विश्वचषकात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या झहीर खानने टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघातील 16 जणांची निवड केली आहे. (Zaheer Khan Picks Team India For T20 WC). झहीर खानने निवडलेल्या 15 खेळाडूंमध्ये संजू सॅमसनला डच्चू दिला आहे. तर आरसीबी संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज यश दयालला यादीत सामील केले आहे. तर सलामीवीर म्हणून झहीर खानने शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांची निवड केली आहे. मात्र या दोघांमधील एकालाच संधी मिळेल असं झहीर खानने सांगितले.


झहीर खानने निवडलेला संघ पुढील प्रमाणे आहे- (Zaheer Khan Picks Team India For T20 WC)


फलंदाज- रोहित शर्मा, शुभमन गिल/ यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह.


अष्टपैलू- शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा.


यष्टीरक्षक- ऋषभ पंत.


गोलंदाज- जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, यश दयाल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल.






रोहित अन् आगरकर यांची अनौपचारिक बैठक


काल मुंबई आणि दिल्लीचा सामना अरुण जेटली मैदानावर झाला. रोहित शर्मा देखील मुंबई संघाचा भाग असल्याने तो दिल्लीत होता. यावेळी अजित आगरकर देखील दिल्लीत दाखल झाले. त्यामुळे आयसीसी टी-20 विश्वचषक 2024च्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट होऊन संघनिवडीबाबत अनौपचारिक बैठक होण्याची शक्यता आहे. अजित आगरकर यांना कर्णधार रोहितशी बोलण्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत भेटून अंतिम संघ निवडण्याची संधी मिळेल. काही खेळाडूंच्या निवडीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळे याबाबत अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यात चर्चा होईल. 


गटवारी 


अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ


भारतीय संघाचे वेळापत्रक


5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 


संबंधित बातम्या:


बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?


रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर VideoI


CC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!