ICC T-20 World Cup 2024: आयपीएल 2024 हंगामानंतर लगेचच 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T-20 World Cup) स्पर्धा होणार आहे. यासाठी अनेक संघांनी आपल्या खेळाडूंची नावेही जाहीर केली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. याचदरम्यान भारतीय संघाची जर्सी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही जर्सी भारतीय संघ विश्वचषकात परिधान करणार असल्याचा दावा देखील केला जात आहे. (Indian Cricket Team Jersey)


लीक झालेल्या जर्सीच्या व्हायरल फोटोमध्ये गळ्याजवळ तिरंग्याची पट्टी आहे, ज्यामध्ये तीन रंग दिसत आहेत. जर्सीचा मोठा भाग निळ्या रंगाचा असून उरलेला भाग भगव्या रंगात दिसून येतोय. टी-20 विश्वचषकात टीम इंडियाची ही जर्सी असेल, असा दावा केला जात आहे. मात्र, जर्सीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 






T20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, चहल. मोहम्मद सिराज.


जेतेपद पटकावणार संघ होणार मालामाल-


टी-20 विश्वचषक पटकावणारा संघ मालामाल होणार आहे. टी-20 विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम 5.6 दशलक्ष डॉलर्स आहे. जर आपण भारतीय रुपयांमध्ये किंमत पाहिली तर ती अंदाजे 46.77 कोटी रुपये येते. त्याचबरोबर विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स मिळतील. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 13.36 कोटी रुपये आहे. तर उपविजेत्याला 6.68 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघावरही पैशांचा वर्षाव होणार आहे.


सुपर-12 स्टेजमधून बाहेर पडलेल्या संघांना किती पैसे मिळतील?


टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना 3.32 कोटी रुपये मिळतील. तर सुपर-12 टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांमध्ये 5.85 कोटी रुपये वितरित केले जातील. म्हणजेच ही रक्कम सर्व संघांमध्ये विभागली जाईल. 2 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. वेस्ट इंडिजशिवाय अमेरिकेच्या मैदानावरही स्पर्धेचे सामने खेळवले जातील. 


विश्वचषकाचा गट असा असेल -


अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ


संबंधित बातम्या:


यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video


टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची धमकी; पाकिस्तानमधून फोन आल्याची माहिती, CWI ने सुरक्षेचे दिले आश्वासन