Maharashtra Cricket News: क्रिकेटचा खेळ पाहणे आणि खेळणे जितके आनंददायी आहे, तितकाच हा खेळ अनेकवेळा धोकादायकही ठरतो. क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडू चेंडू लागून जखमी होतात. अनेकवेळा खेळाडूंचा चेंडू लागून मृत्यू झाल्याचेही समोर आलं आहे. अशीच एक घटना महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात घडली आहे. 


पुण्यातील लोहेगाव येथे क्रिकेट खेळत असताना एका मुलाच्या गुप्तांगावर चेंडू लागल्याने त्याचा मृत्यू झाला. शौर्य उर्फ ​​शंभू कालिदास खांडवे असे मुलाचे नाव आहे. गुरुवारी शौर्य त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. 


नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, शौर्य बॉलिंग करत होता आणि दुसरा मुलगा बॅटिंग करत होता, शौर्याने बॉल फेकताच बॅटिंग करत असलेल्या दुसऱ्या मुलाने शॉट खेळला, तो चेंडू शौर्याच्या प्रायव्हेट पार्टला लागला आणि तो तिथे पडला. शौर्य काही वेळ जमिनीवर पडून राहिला. शौर्य जमिनीवर पडल्यानंतर तेथे उपस्थित असलेले इतर लोक त्यांच्या दिशेने धावले. यानंतर आजूबाजूच्या क्रिकेट खेळणाऱ्या इतर मुलांना बोलावून शौर्यला रुग्णालयात नेण्यात आले. पण शौर्याला रुग्णालयात नेण्यास उशीर झाला होता. त्यानंतर शौर्यला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.


क्रिकेटचे चेंडू कधीकधी जीवघेणे ठरतात-


क्रिकेटचे चेंडू कधीकधी जीवघेणे ठरतात. याआधीही क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या चेंडूंनी अनेकांचे प्राण घेतले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिल ह्यूजची घटना डोळ्यासमोर येते. फलंदाजी करताना फिल ह्युजला चेंडू लागला, त्यानंतर त्याला जीव गमवावा लागला. फिल ह्युजेस बाउन्सर बॉलचा बळी ठरला, जो त्याच्यासाठी जीवघेणा ठरला.


संबंधित बातम्या:


MS धोनीने खेळू नये, चेन्नईने त्याच्या जागी वेगवान गोलंदाजाचा समावेश करावा; हरभजन सिंग संतापला


IPL 2024: प्ले ऑफच्या पात्रतेसाठी 2 संघ जवळपास निश्चित; 3 संघांमध्ये जोरदार रस्सीखेच, पाहा Latest Points Table


ICC T-20 World Cup 2024: यंदाच्या टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेत अव्वल 4 संघ कोणते असतील?; पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स, पाहा Video