GT Vs PKBS: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील मैदानावर (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 48 व्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सला (Punjab Kings Vs Gujarat Titans) आठ विकेट्सनं पराभूत केलं आहे. दरम्यान, या सामन्यात गुजरात टायटन्सची फलंदाजी निराशाजनक झाली. याचवेळी अष्टपैलू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) फलंदाजीदरम्यान युवा खेळाडू साई सुदर्शनवर (Sai Sudharsan) भडकल्याचं पाहायला मिळालं.


नेमक काय घडलं?
या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पंजाबच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे गुजरातच्या संघानं गुडघे टेकले. गुजरातनं 67 धावांवर चार विकेट्स गमावले. यामुळं गुजरातच्या संघाला मोठ्या भागिदारीची गरज होती. त्यावेळी साई सुदर्शन आणि राहुल तेवतियानं संघाचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या विकेट्ससाठी 45 धावांची भागेदारी केली होती. दरम्यान, लियाम लिव्हिंगस्टोनने टाकलेल्या या षटकातील अखेरच्या चेंडूवर तेवतियाला चपळाईनं एकेरी धाव काढायची होती. त्यानं कव्हर-पॉइंटच्या दिशेला चेंडू मारला होता. परंतु, त्यावेळी साई सुदर्शननं नकार दिला, त्यामुळे तेवतियाला क्रिजमध्ये परत जावं लागलं. त्यामुळं तेवतिया साई सुदर्शनवर भडकला. 


आयपीएल 2022 गुणतालिकेत कोणता संघ कितव्या क्रमांकावर?
आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहेत. गुजरातनं दहा पैकी आठ सामन्यात विजय मिळवून 16 गुण प्राप्त केले आहेत. तर, 14 गुणांसह लखनौचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा क्रमांक लागतो. राजस्थानचे 12 गुण आहेत. तर, चौथ्या स्थानावर असलेल्या हैदाबादच्या संघाचे 10 गुण आहेत. याशिवाय, पंजाब किंग्ज पाचव्या क्रमांकावर, आरसीबी सहाव्या क्रमांकावर, दिल्ली कॅपिटल्स सातव्या क्रमांकावर, कोलकाता नाईट रायडर्स आठव्या क्रमांकावर, चेन्नई सुपरकिंग्ज नवव्या क्रमांकावर आणि मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत तळाशी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. 


आज चेन्नईशी भिडणार आरसीबीचा संघ
रॉयल चॅलेंजर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज आयपीएल 2022 मधील 49 वा सामना खेळला जाणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि फाफ डू प्लेसिस आमने- सामने येणार आहे.


हे देखील वाचा-