RCB vs SRH : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दोन दमदार संघ मैदानात उतरतील. यामध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (Chennai Superkings vs Royal challengers bangalore) यांचा समावेस आहे. गुणतालिकेचा विचार करता बंगळुरुचा संघ 10 पैकी पाच सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन पाचव्या स्थानावर आहे. तर चेन्नईचा संघ मात्र संघ 9  पैकी 6 सामने गमावल्याने सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे. बंगळुरुच्या संघाने यंदा अप्रतिम कामगिरी केली असली तरी त्यांना पुढील फेरीत पोहचण्यासाठी आजच्या सामन्यासह पुढील सामने जिंकणं महत्त्वाचं आहे. तर चेन्नईचा कर्णधार पुन्हा धोनी झाल्यानंतर त्यांचा फॉर्मही परतल्याने त्यांच आव्हान बंगळुरुला अवघड ठरेल. त्यामुळे सामना नक्कीच चुरशीचा होईल.


आज होणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु CSK vs RCB) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार असून आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 4 मे रोजी होणारा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरु सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु  यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-