Arundhati Reddy : UAE मध्ये आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कर 2024चा थरार रंगला आहे, ज्यामध्ये आतापर्यंत काही जबरदस्त सामने पाहायला मिळाले आहेत. 6 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आणि 6 विकेट राखून विजय मिळवला.
वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, तिने सामन्यात 3 पाकिस्तानी फलंदाजांना आऊट केले आणि ती सामनावीर देखील ठरली. मात्र, अरुंधतीला आता फटकारण्यात आले आहे कारण ती सामन्यादरम्यान आयसीसी लेव्हल 1 आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. अरुंधतीने एक चूक केली यासाठी आयसीसीने तिला शिक्षा दिली आहे. आयसीसीने सोमवारी संध्याकाळी मीडिया रिलीज जारी केले. याद्वारे अरुंधतीने आयसीसीच्या आचारसंहितेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात आले. यासाठी त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जमा करण्यात आला आहे.
अरुंधती रेड्डीला आयसीसीने का दिली शिक्षा?
पाकिस्तानच्या डावातील 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अरुंधती रेड्डीने निदा दारला बाद केले होते. निदा 28 धावा करून बाद झाली. ती बाद झाल्यानंतर अरुंधतीने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले. त्यादरम्यान तिने पाकिस्तानच्या पॅव्हेलियनकडे हातवारेही केले. हे आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन आहे. या कारणास्तव आयसीसीने अरुंधतीला 1 डिमेरिट पॉइंट दिला आहे. हा स्तर 1 गुन्हा मानला जातो.
आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.5 नुसार, जेव्हा एखादा खेळाडू दुसऱ्या खेळाडूला असभ्य भाषा, अभद्र कृती केले तेव्हा तो स्तर 1 गुन्हा मानला जातो. यासाठी किमान शिक्षा म्हणून 1 डिमेरिट पॉइंट ठेवण्यात आला आहे. या गुन्ह्याची कमाल शिक्षा मॅच फीच्या 50 टक्के दंड आहे. पण अरुंधतीला फक्त 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची दमदार कामगिरी
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 105 धावा केल्या होत्या. यादरम्यान अरुंधतीने 4 षटकात फक्त 19 धावा देत 3 बळी घेतले होते. श्रेयंका पाटीलने 4 षटकात 12 धावा देत 2 गडी बाद केले. तिने एक मेडन ओव्हरही टाकली होती. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 18.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून शफाली वर्माने 32 धावा केल्या.
हे ही वाचा -