(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC : इंग्लंड, न्यूझीलंडच्या खेळाडूंना मागे टाकत झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने रचला इतिहास, जिंकला आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार
ICC : भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यात सिकंदर रझा याने 115 धावांनी एकहाती झुंज दिली होती. झिम्बाब्वे सामना जिंकला नसला तरी सिकंदरनं सर्वांची मनं जिंकली होती, ज्यानंतर आता त्याने आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार देखील मिळवला आहे.
ICC Player of the Month : क्रिकेट जगतातील एकेकाळचा दमदार संघ झिम्बाब्वे (Zimbabwe) मागील काही वर्षात खास कामगिरी न करु शकल्याने मागे पडला आहे. पण आता याच संघातील अनुभवी अष्टपैलू सिकंदर रझा याने (Sikandar Raza) ऑगस्ट महिन्याचा प्लेयर ऑफ मंथ'चा पुरस्कार (ICC Player of the Month) जिंकत इतिहास रचला आहे. त्याने इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि न्यूझीलंडच्या मिचेल सँटनर यांना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीकडून (ICC) दर महिन्याला 'प्लेयर ऑफ मंथ'चा पुरस्कार दिला जातो. महिन्याभरात दमदार कामगिरी करण्याऱ्या क्रिकेटरला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान ऑगस्ट 2022 चा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा याला मिळाला आहे.
Unveiling the ICC Men's Player of the Month for August 2022 🤩
— ICC (@ICC) September 12, 2022
He is the first from his country to win the award ⬇️
सिकंदर रझाची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
सिकंदर रझाची झिम्बाब्वेच्या दिग्गज खेळाडूंमध्ये गणना होते. त्यानं झिम्बाब्वेकडून आतापर्यंत 17 कसोटी, 119 एकदिवसीय आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं अनुक्रमे 1187, 3511, 1040 धावा केल्या आहेत. त्यानं झिम्बाब्वेसाठी कसोटीत एक शतक आणि एकदिवसीय सामन्यात सहा शतकं झळकावली आहेत. त्यानं 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड
आसीसीनं क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माईल, मरिझाने काप आणि इंग्लंडच्या नॅट स्किवर हीला नामांकित करण्यात आलं.
हे देखील वाचा-