एक्स्प्लोर

ICC POTM : 'प्लेअर ऑफ द मंथ'च्या महिला नॉमिनीज जाहीर करताना आयसीसीकडून चूक, सोशल मीडियावर व्हावं लागलं ट्रोल

ICC Player of the month : आयसीसीकडून दरमहिन्याला 'प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार देण्यात येत असून पुरस्कारासाठी आधी तीन नॉमिनीज जाहीर केले जातात.

ICC Player Of the Month : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीने (ICC) 6 डिसेंबर रोजी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी 'प्लेअर ऑफ द मंथ'साठी नामांकित खेळाडू जाहीर केले होते. दरम्यान आयसीसीने आपल्या सोशल मीडियाद्वारे महिला आणि पुरुष अशा दोन्ही खेळाडूंच्या नावांसहित फोटोंची पोस्ट शेअर केली होती. पण हे पोस्टर शेअर करणं आयसीसीला एका चूकीमुळं महाग पडलं आयसीसीच्या एका चुकीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर चांगलच ट्रोल केलं.

महिला नॉमिनीजची पोस्ट शेअर करताना आयसीसीने चुकून महिलांच्या फोटोंच्या खाली पुरुषांची नावे लिहिली होती. आयसीसीची ही मोठी चूक नेटकऱ्यांनीही लगेच पकडली. ज्यानंतर त्यांना चांगलच ट्रोल करण्यास नेटीजन्सनी सुरुवात केली. तीन महिला क्रिकेटपटूंना 'आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ'साठी नामांकन मिळाले होते. यात पाकिस्तानची खेळाडू सिद्रा अमीन, थायलंडची नथकन चंथम आणि आयर्लंडची गॅबी ल्यूईस यांचा समावेश आहे. पण या महिला खेळाडूंच्या फोटोंटी पोस्ट शेअर करताना आयसीसीने पुरुष क्रिकेटपटूंची नावे लिहिली होती. या पोस्टरमध्ये सिद्रा अमीनच्या जागी जॉस बटलर, नट्टाकन चँथमच्या जागी आदिल रशीद आणि गॅबी लुईसच्या जागी शाहीन आफ्रिदी अशी नाव लिहिण्यात आली. आयसीसीने ही चूक कळून येत्याच पोस्ट डिलीट करुन नवी पोस्ट केली पण तोवर संबधित पोस्ट बरीच व्हायरल झाली होती.

सिद्रा अमीननेही केलं आयसीसीला ट्रोल

महिला खेळाडूंमध्ये नामांकन मिळालेल्या पाकिस्तानच्या सिद्रा अमीननेही आयसीसीच्या या चुकीवर त्यांना ट्रोल केलं. तिने तिच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट करत लिहिलं की, "मी आणि जोस बटलर जुळे आहोत हे माहित नव्हतं." यासोबतच तिने हसणारा इमोजीही शेअर केला. या ट्विटमध्ये सिद्रा अमीनने तोच फोटो वापरला होता ज्यामध्ये आयसीसीने चूक केली होती.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : कधी तोंडही दाखवू नको...; LIVE सामन्यात भारताचे 2 समालोचक भिडले, एकमेकांना नको ते बोलत बसले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कधी तोंडही दाखवू नको...; LIVE सामन्यात भारताचे 2 समालोचक भिडले, एकमेकांना नको ते बोलत बसले, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
IND vs SL 1st Test DAY-4 Live : श्रीलंकेचा डाव 284 धावांत गडगडला! भारताला 178 धावांची आघाडी, आता गॉलमध्ये टीम इंडियाचा ‘मास्टरप्लॅन’!
श्रीलंकेचा डाव 284 धावांत गडगडला! भारताला 178 धावांची आघाडी, आता गॉलमध्ये टीम इंडियाचा ‘मास्टरप्लॅन’!
Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget