ICC ODI Ranking Rohit Sharma-Virat Kohli: दो भाई, दोनों तबाही...; वनडे रँकिंगमध्ये रोहित नंबर 1, तर विराटची दुसऱ्या स्थानावर झेप, टॉप 10 फलंदाजांची उलथापालथ
ICC ODI Ranking Rohit Sharma-Virat Kohli: आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारी जाहीर केली आहे.

ICC ODI Ranking Rohit Sharma-Virat Kohli नवी दिल्ली: आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारी (ICC ODI Ranking) जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत विराट कोहली चौथ्या स्थानावर होता आणि आता तो एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत 'रोको'चं वर्चस्व पाहायला मिळत आहे. (ICC ODI Ranking Rohit Sharma-Virat Kohli)
Quality performances across formats have translated into fresh gains in the latest ICC Men’s Player Rankings 💪
— ICC (@ICC) December 10, 2025
Read more 👇https://t.co/NePL14NTcD
शुभमन गिल पाचव्या स्थानावर- (ICC ODI Ranking Shubhman Gill)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विराट कोहलीच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याला 773 रेटिंग गुण मिळाले आहेत आणि क्रमवारीत दोन स्थानांनी वाढ झाली आहे. रोहित शर्मा 781 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. डॅरिल मिशेल 766 गुणांसह एका स्थानाने घसरून तिसऱ्या स्थानावर आहे. इब्राहिम झद्रान (764) चौथ्या स्थानावर आहे आणि शुभमन गिल (723) पाचव्या स्थानावर आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीच्या 300 हून अधिक धावा- (Virat Kohli ODI Ranking)
विराट कोहलीने अलिकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत अविश्वसनीय कामगिरी केली. ज्यामुळे भारताला 2-1 अशी मालिका जिंकण्यास मदत झाली. कोहलीने सलग दोन शतके आणि एक जलद अर्धशतक झळकावून आपला प्रभावी फॉर्म दाखवला. तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीने 302 धावा केल्या. विराट कोहलीच्या या आक्रमक कामगिरीमुळे प्रभावी कामगिरीसाठी विराट कोहलीला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.
रोहित शर्माचा 20,000 धावांचा टप्पाही गाठला- (Rohit Sharma ODI Ranking)
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहित शर्माने शतक झळकावले नसले तरी, त्याने सलामीवीर म्हणून दोन महत्त्वाची अर्धशतके झळकावली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 57 धावा केल्यानंतर, त्याने त्यानंतर निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 75 धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात, रोहित शर्माने यशस्वी जैस्वालसोबत 155 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारतीय संघाला 271 धावांचे लक्ष्य गाठण्यास मदत झाली. या मालिकेदरम्यान, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 धावांचा टप्पाही गाठला.
- 38 Year Old Rohit Sharma is No.1 Ranked.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 10, 2025
- 37 Year Old Virat Kohli is No.2 Ranked.
THE GREATEST DUO OF ODI CRICKET..!!! 🫡🇮🇳 pic.twitter.com/5jfEiXUZLH





















