IND vs PAK : बलाढ्या भारताचा सामना खचलेल्या पाकिस्तानविरोधात, कोण मारणार बाजी ?
India vs Pakistan Match : भारत आणि पाकिस्तान संघांमधला सामना जगभरातल्या क्रिकेटरसिकांचं सर्वात मोठं आकर्षण असतं. अमेरिका आणि विंडीजमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या निमित्तानं न्यूयॉर्कच्या रणभूमीवर भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येतायत.
ICC Men's T20 World Cup, India vs Pakistan Match : ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आज रात्री आठ वाजता भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. विश्वचषक हा वन डे सामन्यांचा असो किंवा ट्वेन्टी ट्वेन्टीचा... भारत आणि पाकिस्तान संघांमधला सामना जगभरातल्या क्रिकेटरसिकांचं सर्वात मोठं आकर्षण असतं. अमेरिका आणि विंडीजमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या निमित्तानं न्यूयॉर्कच्या रणभूमीवर भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येतायत. 2023 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकात भारतीय संघानं पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. आता टी20 विश्वचषकात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांचा आमनासामना होत आहे. भारतीय संघाचे पारडे जड दिसत आहे. कारण, पाकिस्तानला साखळी सामन्यात अमेरिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला.तर भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघावर विजयाचा प्रचंड दबाव असणार आहे. त्यात भारताविरोधात भिडायचेय, ते वेगळेच. पाकिस्तानसाठी आजचा सामना करो या मरो असाच असेल.
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या साखळीत आज भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होईल. या सामन्यानिमित्तानं भारतीय फलंदाजी आणि पाकिस्तानचं आक्रमण अशी लढाई पुन्हा विश्वचषकाच्या मैदानात पाहायला मिळेल. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या विश्वचषकातल्या भवितव्याच्या दृष्टीनं हा सामना निर्णायक ठरणार आहे. कारण पाकिस्तानला सलामीच्या सामन्यात अमेरिकेकडून हार स्वीकारावी लागली आहे. त्यामुळं आज भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला हार परवडणारी नाही.
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या भारत-पाकिस्तान सामन्यानिमित्तानं न्यूयॉर्कची खेळपट्टी पुन्हा एकदा वादाचा विषय ठरणार का? फलंदाजांशी पूर्वार्धात फटकून वागणारी ही खेळपट्टी भारत किंवा पाकिस्तानला न्याय देणार का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या जाणकार क्रिकेटरसिक विचारत आहेत. कारण विश्वचषक ट्वेन्टी ट्वेन्टीचा असला तरीही न्यूयॉर्कच्या खेळपट्टीतून धावांचं पीक काही निघता निघत नाहीय. त्यामुळंच अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघांमधला साखळी सामना आता अवघ्या काही तासांवर आलाय. विश्वचषकातल्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेसारख्या तुलनेत दुबळ्या संघाकडून धक्कादाक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं भारतासारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करताना पाकिस्तान संघ अधिक जिद्दीनं मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातलं आव्हान कायम राखायचं तर पाकिस्तानला भारताविरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. कारण पाकिस्तानला सलामीच्या सामन्यात अमेरिकेकडून धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यापाठोपाठ भारतानंही पाकिस्तानवर विजय साजरा केला, तर पाकिस्तानचं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातलं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.