ICC Mens ODI Rankings: इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 10 विकेट्नं विजय मिळवून भारतीय संघानं (Team India) आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानच्या (Pakistan) संघाला पछाडलं आहे. आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय पुरूष संघाच्या क्रमवारीनुसार, भारतीय संघानं एका स्थानानं बढत मिळवून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, पाकिस्तानची एका स्थानानं घसरण झाली आहे. या क्रमवारीत पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. 


इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघ 105 गुणांसह आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर होता. तर, पाकिस्तानचा संघ 106 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होता. परंतु, इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारताचे 108 गुण झाले. ज्यानंतर भारत तिसऱ्या स्थानावर पोहचला तर, पाकिस्तानच्या संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली. 


ट्वीट-



आयसीसी एकदिवसीय क्रमावारीत अव्वल कोण?
आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीनुसार, वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचे 122 गुण आहेत. तर, न्यूझीलंडचा संघ 122 गुणांसह अव्वल स्थानी आहे. 


तिन्ही फॉरमेटमध्ये भारत टॉप-3 मध्ये
भारतीय पुरूष संघ सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या, कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय क्रिकेट संघ हा एकमेव संघ आहे, जो तिन्ही फॉरमॅटमध्ये टॉप 3 मध्ये स्थान आहे. एकेकाळी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर होता. परंतु, मध्यंतरीच्या काळात भारतानं फार कमी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामुळं भारताची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली होती. मात्र, भारतीय पुरूष संघाला आगामी काळात अनेक एकदिवसीय क्रिकेट सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत भारताला पहिलं स्थान गाठण्याची संधी आहे. महत्वाचं म्हणजे, आससीसी क्रमवारीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानांमध्ये खूप अंतर असल्यानं भारताला एक- दोन सामने जिंकून चालणार नाही. 


हे देखील वाचा-