Best ODI figures for India: लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 10 विकेट्सनं विजय मिळवलाय. भारताच्या विजयात वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) मोलाटा वाटा उचलला. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं सुरुवातीपासूनचं आक्रमक गोलंदाजी करत इंग्लंडच्या सहा फलंदाजाला माघारी धाडलं. या कामगिरीसह जसप्रीत बुमराहनं एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाज यादीत स्थान मिळवलं आहे.
एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा स्टुअर्ड बिन्नी अव्वल स्थानी आहे. त्यानं 2014 मध्ये बांग्लादेशविरुद्ध 4 धावा देऊन सहा विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 1993 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 12 धावा देऊन सहा विकेट्स घेणारे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत जसप्रीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या पहिल्या दिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहनं 19 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहनंतर अशिष नेहरा आणि कुलदीप यादवचा क्रमांक लागतो. आशिष नेहरानं 2003 मध्ये इंग्लडविरुद्ध 23 धावा खर्च करून 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर, कुलदीप यादवनं 2018 साली खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाज-
क्रमांक | गोलंदाज | सर्वोत्तम कामगिरी | विरुद्ध संघ | ठिकाण | वर्ष |
1 | स्टुअर्ट बिन्नी | 6/4 | बांग्लादेश | मिरपूर | 2014 |
2 | अनिल कुंबळे | 6/12 | वेस्ट इंडीज | कोलकाता | 1993 |
3 | जसप्रीत बुमराह | 6/19 | इंग्लंड | द ओव्हल | 2022 |
4 | अशिष नेहरा | 6/23 | इंग्लंड | डर्बन | 2003 |
5 | कुलदीप यादव | 6/25 | इंग्लंड | नॉटिंगहॅम | 2018 |
भारताची मालिकेत 1-0 नं आघाडी
इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडच्या संघाला 25.2 षटकात 110 धावांवर रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा आणि मोहम्मद शामीनं तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
हे देखील वाचा-