Most Partnership Runs for First Wicket : लंडनच्या (London) केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) येथे भारत आणि इंग्लंड (England Vs India) यांच्यात काल पहिला एकदिवसीय सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा- शिखर धवन (Rohit Sharma- Shikhar Dhawan) यांच्यातील 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर भारतानं 10 विकेट्सनं विजय मिळवला. या भागीदारीसह रोहित शर्मा- शिखर धवन यांचा दिग्गाजांच्या यादीत समावेश झालाय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या विकेट्ससाठी 5000 धावांची भागेदारी करणारी रोहित आणि शिखरची चौथी सलामी जोडी ठरली आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, एकदिवसीय सामन्यात पहिल्या विकेट्ससाठी भागेदारी करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांची जोडी अव्वल स्थानी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या सलामी जोडीनं 6 हजार 609 धावा केल्या आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मॅथ्यू हेडन यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या नावावर 5 हजार 372 धावांची नोंद आहे. या यादीत वेस्ट इंडीजचे डेसमंड हेन्स आणि गॉर्डन ग्रीनिज यांची जोडी 5 हजार 150 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दिग्गजांच्या पंक्तीत रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या जोडीचा समावेश झाला आहे. दोघांच्या नावावर 5 हजार 15 धावांची नोंद आहे.  

पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी-

क्रमांक सलामी जोडी धावा
1 सचिन तेंडुलकर- सौरव गांगुली 6 हजार 609
2 अॅडम गिलख्रिस्ट- मॅथ्यू हेडन 5 हजार 372
3 डेसमंड हेन्स- गॉर्डन ग्रीनिज 5 हजार 150
4 रोहित शर्मा-  शिखर धवन 5 हजार 15

 

भारतानं पहिला एकदिवसीय सामना जिंकला
इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडच्या संघाला 25.2 षटकात 110 धावांवर रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा आणि मोहम्मद शामीनं तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 

हे देखील वाचा-