Michael Vaughan on Bumrah: भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडला 10 विकेट्सनं नमवलं. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारतानं इग्लंडला अवघ्या 110 धावांवर रोखलं. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या सलामी जोडीनं शतकीय भागेदारी करत भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडा घेतली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) नेत्रदीपक कामगिरी बजावली. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. यानंतर इग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननं (Michael Vaughan) जसप्रीत बुमराहचं तोंडभरून कौतूक केलं.


जसप्रीत बुमराह भारताच्या विजयाचा शिल्पकार
भारताच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार जसप्रीत बुमराहनं सुरुवातीपासूनच आक्रमक गोलंदाजी करत इग्लंडच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. या सामन्यात बुमराहनं 19 धावा खर्च करून 6 विकेट्स घेतल्या. या चमकदार कामगिरीनंतर दिग्गज क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. यातच इग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनंही जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचं कौतूक केलंय. तसेच तिन्ही फॉरमॅटमध्ये जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचं त्यानं म्हटलंय. 


मायकल वॉननं काय म्हटलं?
क्रिकबझशी बोलताना मायकल वॉन म्हणाला की, "कोणताही शंका उपस्थित न करता, जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या तिन्ही फॉरमेटमधील सर्वोत्तम गोलंदाज आहे. शाहीन शाह आफ्रिदी, ट्रेन्ट बोल्ट यांसारख्या गोलंदाजाला तिन्ही फॉरमेटमधील सर्वोत्तम गोलंदाजाच्या यादीत ठेवू  शकता. परंतु, जसप्रीत बुमराह त्याच्या गतीनं, कौशल्यानं, सीम आणि स्वीम तसेच यॉर्कर आणि धीम्या गतीच्या गोलंदाजीमुळं दिवसेंदिवस चमकदार कामगिरी करत आहे.


भारताचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात 10 विकेट्सनं विजय
इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 10 विकेट्सनं विजय मिळवलाय. भारताच्या विजयात संघाचा वेगवाग गोलंदाज जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) मोलाटा वाटा उचलला. या सामन्यात जसप्रीत बुमराहनं सुरुवातीपासूनचं आक्रमक गोलंदाजी करत इंग्लंडच्या सहा फलंदाजाला माघारी धाडलं. या कामगिरीसह जसप्रीत बुमराहनं एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारे गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. 


हे देखील वाचा-