ICC Champions Trophy 2025: पाकिस्तानला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद मिळाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला 586 कोटी रुपये दिले आहेत. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार असून त्याबाबत बरीच चर्चा झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाण्यास तयार नाही. त्यामुळे भारताचे सामने श्रीलंका किंवा यूएईमध्ये होऊ शकतात. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पीटीआयच्या एका बातमीनुसार, पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीने सुमारे 70 दशलक्ष डॉलर्सचे बजेट मंजूर केले आहे. आयसीसीच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या वित्त आणि वाणिज्य समितीने या बजेटला मंजुरी दिली. अंदाजे अंदाजपत्रकासह, अतिरिक्त खर्चासाठी $4.5 दशलक्ष प्रदान केले आहेत. जर 7 कोटी डॉलर भारतीय रुपयात रूपांतरित केले तर ते सुमारे 586 कोटी होईल.
अतिरिक्त पैसेही दिले-
वास्तविक टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास तयार नाही. जर भारतीय संघ पाकिस्तानला गेला नाही तर त्याचे सामने श्रीलंका किंवा दुबईत होऊ शकतात. अशा परिस्थितीत खर्च वाढेल. या कारणास्तव आयसीसीने पाकिस्तानसाठी अतिरिक्त बजेटची देखील तरतूद केली आहे. टीम इंडिया इतर ठिकाणी खेळली तर त्यासाठी 45 लाख डॉलर्स देण्यात आले आहेत. मात्र ही रक्कम कमी असेल, असा अंदाज आहे.
टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार-
बीसीसीआयने अनेकवेळा आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात न गेल्यास ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली जाईल. ज्या अंतर्गत भारताचे सामने दुबई किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खेळवले जातील.
आशिया चषकासाठी बीसीसीआयने दिला होता नकार-
गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे.
संबंधित बातमी:
गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!
भारत अन् दक्षिण अफ्रिका मॅच फिक्सिंग, 24 वर्षांनंतर प्रकरणाला नवे वळण, 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल