IND vs SL ODI Series: भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. याआधीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचे दोन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. मथिशा पाथिराना आणि दिलशान मदुशंका हे भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाहीत. श्रीलंकेने या दोघांच्या जागी मोहम्मद शिराज आणि इशान मलिंगाला संघात स्थान दिले आहे. यासोबतच संघाने आणखी तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवले आहे.


भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत श्रीलंकेला 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. आता श्रीलंकेला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.  आज मालिकेतील पहिला सामना होणार आहे. याआधीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचे दोन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. मदुशंका आणि पाथिराना भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाहीत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक्सवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली.


माघार घेण्याचं कारण काय?


उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज पाथिरानाने अनेक वेळा संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. मात्र तो एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. भारताविरुद्धच्या टी-20 सामन्यात डायव्हिंग करताना पाथिराना जखमी झाला. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मधुशंकाला स्नायूंचा ताण झाल्यामुळे त्यानेही माघार घेतली आहे. 






भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ-


चारिथ असलांका (कर्णधार), पॅटम निसांका, अविश्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सादिरा समराविक्रम, कामिंदु मेंडिस, झेनिथ लियानगे, मोहम्मद शिराज, वानिंदु हसेरंगा, डुनिथ व्हेलागे, महिरन्के एक फर्नांडो, इशान मलिंगा.


दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज...


भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका 2 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यानंतर दुसरा वनडे सामना 4 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. या मालिकेतील तिन्ही एकदिवसीय सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील. रोहित शर्माशिवाय विराट कोहली आणि कुलदीप यादवसारखे खेळाडू वनडे मालिकेत टीम इंडियाचा भाग असतील.


एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक-


2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)


4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)


7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)


संबंधित बातमी:


गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!