India vs Sri Lanka Suryakumar Yadav Gautam Gambhir: मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा (Ind vs SL) थरारक सुपर ओव्हर सामन्यात पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 137 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने चांगली सुरुवात केल्यावर भारताचा पराभव होईल असे वाटत होते, मात्र शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 20 व्या षटकात 2 बळी आणि रिंकू सिंगच्या (Rinku Singh) 19व्या षटकात श्रीलंकेला गुडघे टेकण्यास भाग पाडले. श्रीलंकेने देखील 8 विकेट्स गमावत 137 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत पोहचला आणि यामध्ये भारताने बाजी मारली. 


गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय- (Suryakumar Yadav-Gautam Gambhir)


श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार गौतम गंभीर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने घेतलेल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकीत केले आणि श्रीलंकेच्या थिंक टँकने याबाबत विचारही केला नव्हता. त्यामधील पहिला निर्णय म्हणजे रिंकू सिंहला 19 वी ओव्हर देणं. दुसरा निर्णय श्रीलंकेला विजयासाठी 6 चेंडूत 6 धावांची आवश्यकता असताना सूर्यकुमार यादवने गोलंदाजी करणं. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि खलील अहमद यांनी सामन्यात प्रत्येकी 3-3 षटके टाकली होती. दोघांची प्रत्येकी 1-1 षटक बाकी होती. त्यामुळे शेवटची दोन षटक मोहम्मद सिराज आणि खलील अहमद टाकेल, असा अंदाज सर्वांना होता. मात्र असे न करता रिंकू सिंह आणि सूर्यकुमार यादवने गोलंदाजी केली आणि सामना भारताकडे खेचून आणाला. तसेच गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवचा चौथा चक्रवणारा निर्णय म्हणजे सुपर ओव्हरमध्ये फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी देणे. सामन्यात मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये मोहम्मद सिराज गोलंदाजी करेल, अशी शक्यता होती. परंतु गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. 


सुपर ओव्हरचा थरार-


फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू वाईड गेला. त्यानंतर एक धाव श्रीलंकेने काढली. वॉशिंग्टनने पुढी दोन्ही चेंडूत दोन विकेट्स घेतल्या. दुसऱ्या चेंडूवर  चेंडूवर कुसल परेरा आणि तिसऱ्या चेंडूवर पथुम निसांकाही बाद झाला. श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये केवळ 2 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी अवघ्या 3 धावा करायच्या होत्या. भारतासाठी सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.






संबंधित बातमी:


Ind vs SL: गौतम गंभीरचा मेसेज, सूर्यकुमार यादवची हालचाल; रिंकू सिंहच्या हातात चेंडू अन् तो एक क्षण!