(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virat Kohli : किंग कोहलीच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी इडन गार्डनवर 'खतरनाक तयारी'! तब्बल 70 हजार मास्क अन् बरंच काही..
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला हरवून विराट कोहलीला विजयाची भेट देऊ इच्छितो. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्डकप थरार 5 नोव्हेंबरला होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. त्यावेळीच टीम इंडियाचा राॅकस्टार विराट कोहलीचा 35 वा वाढदिवस साजरा होणार आहे. विराट कोहलीचा वाढदिवस संस्मरणीय बनवण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने विशेष व्यवस्था केली आहे. वास्तविक, या दिवशी स्टेडियममध्ये अंदाजे 70 हजार चाहते विराट कोहलीच्या मास्कमध्ये दिसतील. याशिवाय खास केक कापला जाणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशन विराट कोहलीचा वाढदिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.
Celebration of Virat Kohli's birthday at Eden Gardens by CAB. [RevSportz]
— Johns. (@CricCrazyJohns) October 30, 2023
- 70,000 masks of Virat Kohli for fans.
- Special cake cutting.
- Laser show.
- Fireworks pic.twitter.com/iSmVJBmgzJ
विराट कोहलीच्या वाढदिवसाला काय होणार?
विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त इडन गार्डन्समध्ये लेझर शोचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच भरपूर फटाके फोडले जातील. त्याचबरोबर या दिवशी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सुरू होईल.
Indians part of most wins:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 29, 2023
Virat Kohli - 307*.
Sachin Tendulkar - 307.
Indians part of most ODI World Cup wins:
Virat Kohli - 27*.
Sachin Tendulkar - 27.
- Two🐐 of our game...!!! pic.twitter.com/V0iRYCPWul
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला हरवून विराट कोहलीला विजयाची भेट देऊ इच्छितो. सध्या भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून, रोहित शर्माच्या संघाने सर्व सामन्यांमध्ये विरोधी संघांना पराभूत केले आहे. अशा प्रकारे भारताचे 12 गुण झाले आहेत.
विश्वचषकात विराट कोहलीची जबरदस्त कामगिरी
रविवारी लखनौमध्ये भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात विराट कोहली एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, या स्पर्धेत विराट कोहलीच्या बॅटने आग लागली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 6 सामन्यात 88.50 च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत. मात्र, विराट कोहली त्याच्या वाढदिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नक्कीच मोठी खेळी करेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.
इतर महत्वाच्या बातम्या