एक्स्प्लोर
Advertisement
विश्वचषक 2019च्या हंगामातील सुपरस्टारची यादी जाहीर, भारताच्या एकमेव खेळाडूचा समावेश
विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीपूर्वीच आयसीसीने या विश्वचषकातील चार सुपरस्टारची यादी ट्विटरवर जाहीर केली आहे.
मूंबई : विश्वचषक 2019 चा हंगाम जोमात सुरु आहे. या विश्वचषकात अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर संघाला सर्वोत्तम स्थानावर नेऊन ठेवले आहे. या हंगामात असे तीन खेळाडू आहेत की ज्यांनी कठीण प्रसंगी उत्तम खेळ करत आतापर्यंत 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीपूर्वीच आयसीसीने या विश्वचषकातील चार सुपरस्टारची यादी ट्विटरवर जाहीर केली आहे. या यादीत रोहित शर्मा, मिशेल स्टार्क, जो रुट आणि अॅलेक्स कॅरी यांचा समावेश आहे. सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त विकेट, सर्वात जास्त यष्टीचीत यात सर्वोतकृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा यात समावेश आहे.
रोहित शर्मा
रोहित शर्मा हा या विश्वचषक 2019 च्या हंगामातील एकमेव खेळाडू आहे ज्याने सर्वात जास्त रन बनवले आहे. श्रीलंकेच्या विरुद्ध शतक झळकावत विश्वचषक स्पर्धेत 5 शतक झळकावणारा रोहित हा जगातील एकमेव फलंदाज बनला आहे.
मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा 29 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आयसीसीच्या या यादीतील सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज आहे. आतापर्यंत त्यांने एकूण 26 बळी घेतले आहेत. यॉर्करसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टार्कने या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला सेमीफाइनलमध्ये आणले.
जो रुट
इंग्लंडच्या टॉप ऑर्डर फलंदाजांच्या क्रमनवारीत जो रुट असा खेळाडू आहे की ज्याने आतापर्यंत 11 कॅच घेत 500 धावा केल्या आहेत. 28 वर्षीय या खेळाडूच्या नावावर दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
अॅलेक्स कॅरी
विश्वचषक 2019 च्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने यष्टीच्या मागे सर्वाधिक झेल घेतल्या आहेत. आगामी काळात अॅलेक्स ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अॅडम गिलख्रिस्टचा 21 वर्षांचा विक्रम मोडू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement