ICC Champions Trophy 2025: पाकिस्तान पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे(ICC Champions Trophy 2025) यजमानपद भूषवणार आहे. 1996 च्या विश्वचषकानंतरची ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे.  चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकाला आयसीसीने देखील मंजुरी दिली आहे. मात्र भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. याचदरम्यान आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. 


2025 च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचं समोर आलं आहे. तसेच बीसीसीआय आयसीसीकडे दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्यास सांगणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बीसीसीआयच्या या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या वर्षी आशिया चषक 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आला होता, ज्याचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने तेथे खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. यावेळीही असेच काही घडण्याची अपेक्षा आहे. 






पाकिस्तानचा माजी फलंदाज काय म्हणाला होता?


पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज रशीद लतीफ म्हणाला की, संघ संमतीनंतर आयसीसी स्पर्धेसाठी स्वाक्षरी करतात, मग तुम्ही नकार कसा देऊ शकता? पाकिस्तानमध्ये परिस्थिती चांगली नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही... त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा नाकारला, तर त्याचा फटका बसू शकतो, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात, असा इशारा लतीफने दिला होता.


टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची निवड-


भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नुकतीच गौतम गंभीरची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकपदावरुन राहुल द्रविड टी 20 विश्वचषकानंतर संपल्यानंतर निवृत्त झाले. राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात आली आहे.


संबंधित बातम्या:


आता हार्दिक पांड्याच्या फोटोची रंगली चर्चा; नताशानेही साधलं टायमिंग, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?


हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमकं काय घडलं?