आमच्यात काय बोलणं झालं, कुठे बोलणं झालं...; विराट कोहलीवर प्रश्न विचारताच गौतम गंभीरचं रोखठोक उत्तर!
Gautam Gambhir PC With Ajit Agarkar: भारताला अभिमान वाटावा, यासाठी आम्ही खूप मेहनत घेणार आहोत, असंही गौतम गंभीरने यावेळी सांगितले.
Gautam Gambhir PC With Ajit Agarkar: भारतीय क्रिकेट संघ (Team India) आज श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना झाला. याआधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी गौतम गंभीरने विराट कोहलीसोबतच्या (Virat Kohli) नात्यावर देखील भाष्य केलं.
आमच्या दोघांबाबत जे काही सुरु असतं ते टीआरपीसाठी पोषक आहे. मात्र विराट कोहली आणि माझे चांगलं नातं आहे, असं गौतम गंभीरने सांगितले. मैदानावर प्रत्येकाला स्वत:च्या जर्सीसाठी लढण्याचा आणि ड्रेसिंग रुममध्ये विजयासह परत येण्याचा अधिकार आहे. पण आता आम्ही 140 कोटी भारतियांचे प्रतिनिधित्व करत आहोत. एकत्र मिळून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करु, मैदानाबाहेर आमचं नातं चांगलं आहे आणि तसेच ते कायम राहिले, असंही गौतम गंभीर म्हणाला.
पत्रकार परिषदेत तुझं विराट कोहलीसोबत बोलणं झालं का?. असा सवाल विचारण्यात आला. यावर हो, आमच्यात मेसेजद्वारे बोलणं झालं. मात्र काय संवाद झाला हे जगजाहीर करणार नाही, असं गौतम गंभीर म्हणाला. आमच्यात काय बोलणं झालं, कुठे बोलणं झालं, कोच झाल्यानंतर संवाद झाला की त्याआधी, हे मी सांगणार नाही. याआधीही आमच्यात खूपदा बोलणं झालं आहे. मी एक खेळाडू म्हणून विराट कोहलीची फार इज्जत करतो. तो एक महान खेळाडू आहे. भारताला अभिमान वाटावा, यासाठी आम्ही खूप मेहनत घेणार आहोत, असंही गौतम गंभीरने यावेळी सांगितले.
Gambhir said "I shared a great relationship with Virat Kohli, we exchange messages - he is World class, World class batter, I have told many times, we both will work hard for team India & make 140 crore people proud". pic.twitter.com/FxV4hbWAFD
— Johns. (@CricCrazyJohns) July 22, 2024
विराट कोहली-रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळणार?
नुकताच भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकला. भारत विश्वविजेता बनल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 फॉरमॅटला अलविदा केला. पण आता प्रश्न असा आहे की विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळणार का? या प्रश्नाच्या उत्तरात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, विराट कोहली आणि रोहित शर्माकडे भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. विराट आणि रोहित दोघंही जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. ते दोघं कोणत्याही संघात नक्कीच असतील. चॅम्पियन्स ट्रॉफी असो, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका असो...जर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची फिटनेस चांगली असेल तर ते नक्कीच 2027 चा विश्वचषकही खेळतील, असं गौतम गंभीर म्हणाला.
संबंधित बातम्या:
रोहित शर्मा अन् विराट कोहली कधीपर्यंत संघात असणार?; गौतम गंभीरचं पत्रकार परिषदेत धडाधड उत्तर!