WTC Final Team India Scenarios : ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव, तरीही टीम इंडिया पोहोचू शकते फायनलमध्ये; जाणून घ्या नेमकं कसं? चमत्काराचं समीकरण काय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीची शर्यत प्रत्येक सामन्यासह अधिक रंजक होत आहे.
World Test Championship 2023-25 Qualification Scenarios : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीची शर्यत प्रत्येक सामन्यासह अधिक रंजक होत आहे. कसोटी हंगाम सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया जेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असल्याचे दिसत होते, परंतु त्यांना घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 3-0 ने पराभवाचा सामना करावा लागला. या कारणास्तव डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या त्याच्या आशा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अवलंबून आहेत.
भारताने या दौऱ्याची शानदार सुरुवात केली होती आणि पर्थमध्ये दणदणीत विजय मिळवला होता, पण ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन केले आणि रोहित शर्माच्या संघाला मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर, भारत डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहे की अद्याप शर्यतीत आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Massive win in Adelaide for Australia as they level the series 1-1 💪#WTC25 | #AUSvIND 📝: https://t.co/D4QfJY2DY1 pic.twitter.com/RXZusN98wU
— ICC (@ICC) December 8, 2024
डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का!
ॲडलेड कसोटीपूर्वी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये 15 सामन्यांमध्ये 61.11 च्या पीसीटीसह पहिल्या स्थानावर होता, परंतु आता त्याच्या स्थानामध्ये मोठा बदल झाला आहे. आता भारतीय संघ दोन स्थानांच्या पराभवासह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे पीसीटी देखील केवळ 57.29 पर्यंत घसरले आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ 14 सामन्यांमध्ये 60.71 च्या पीसीटीसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिका 9 सामन्यात 59.26 च्या पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंका अजूनही रेसमध्ये आहे. पण न्यूझीलंड बाहेर गेला आहे, त्यामुळे अंतिम फेरीची शर्यत खूपच रंजक बनली आहे.
WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताचे समीकरण
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील उर्वरित तीन सामने भारतीय संघाने जिंकले, तर तो कोणत्याही अडचणीशिवाय अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. यासह, भारताचे पीसीटी 64.04 पर्यंत वाढेल. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 2-0 ने हरवले तरी पीसीटीच्या बाबतीत भारताची बरोबरी करू शकणार नाही.
Australia win the second Test and level the series.#TeamIndia aim to bounce back in the third Test.
— BCCI (@BCCI) December 8, 2024
Scoreboard ▶️ https://t.co/upjirQCmiV#AUSvIND pic.twitter.com/Tc8IYLwpan
पण बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 4-1 ने जिंकण्यात भारताला यश आले नाही तर त्याचा सर्वात मोठा धोका ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेकडून असेल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ चांगली कामगिरी करत आहेत. दक्षिण आफ्रिकाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर दुसऱ्या कसोटीतही आपले स्थान मजबूत केले आहे. जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला तर ते 63.33 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचेल. त्यामुळे टीम इंडियावर अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे.
हे ही वाचा -