Harshit Rana Duleep Trophy 2024: हर्षित राणाने (Harshit Rana) आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून चांगली कामगिरी केली. हर्षित राणा दुलिप ट्रॉफीच्या (Duleep Trophy) स्पर्धेत इंडिया डी संघाकडून खेळत आहे.  मात्र हर्षित राणाने केलेल्या एका कृत्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. 


हर्षितने 7 षटकात 5 निर्धाव षटक टाकले, 13 धावांत केवळ 2 विकेट घेतल्या. परंतु या दरम्यान हर्षितने असे काही केले ज्यामुळे त्याच्या अडचणी वाढू शकतात. जेव्हा हर्षितने इंडिया सी संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडला बाद केले तेव्हा त्याने फ्लाइंग किस देऊन आनंद साजरा केला.


आयपीएलमध्ये हर्षित राणाने मयंक अग्रवालला बाद झाल्यानंतर फ्लाइंग किस दिली होती. यानंतर बीसीसीआयकडून हर्षित राणाला दंड आणि एका सामन्याची बंदी ठोठवण्यात आली. मात्र कारवाईनंतरही हर्षित राणाने दुलिप ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर फ्लाइंग किस दिली. हर्षित राणाने केलेल्या या चुकीमुळे बीसीसीआय पुन्हा कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 






हर्षितची शानदार गोलंदाजी-


भारत सी आणि भारत डी यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी हर्षितने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. हर्षितने 7 षटके टाकली, ज्यात त्याने 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे हर्षितने 7 पैकी 5 निर्धाव षटके टाकली. हर्षितने केवळ 13 धावा दिल्या. हर्षित हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्षितशिवाय अक्षर पटेलनेही 2 विकेट्स घेतल्या. 


स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक-


पहिला सामना- 5-8 सप्टेंबर 09:30 AM, भारत अ विरुद्ध भारत ब, चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू, कर्नाटक


दुसरा सामना- 5-8 सप्टेंबर 09:30 am, India C vs India D, ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर, आंध्रप्रदेश


तिसरा सामना- 12-15 सप्टेंबर 09:30 AM, India A vs India D, ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर, आंध्रप्रदेश


चौथा सामना- 12-15 सप्टेंबर 09:30 AM, India B vs India C, रूरल डेव्हलपमेंट ट्रस्ट स्टेडियम B, अनंतपूर, आंध्रप्रदेश


पाचवा सामना- 19-22 सप्टेंबर 09:30 AM, India A vs India C, ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम, अनंतपूर, आंध्रप्रदेश


सहावा सामना- 19-22 सप्टेंबर 09:30 AM, India B vs India D, Rural Development Trust Stedium B, अनंतपूर, आंध्रप्रदेश.


तुम्ही सामना कुठे पाहणार?


स्पोर्ट्स 18 च्या माध्यमातून दुलिप ट्रॉफीचे सामने टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जातील. याशिवाय स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर केले जाईल. चाहत्यांना JioCinema वर विनामूल्य सामन्यांचा आनंद घेता येईल.


संबंधित बातमी:


यशस्वी जैस्वालच्या फोटोची सोशल मीडियावर पुन्हा रंगली चर्चा; कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?