यशस्वी जैस्वालच्या फोटोची सोशल मीडियावर पुन्हा रंगली चर्चा; कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?
भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सामन्यात पहिल्याच डावात यशस्वी जैस्वालने शतक झळकावले. यानंतर कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्ये यशस्वी जैस्वालने चांगली कामगिरी करत टीम इंडियातील आपले स्थान निश्चित केले.
तसेच यशस्वी जैस्वालची आयपीएलमधील कामगिरी देखील दमदार राहिली. आता यशस्वी जैस्वाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सध्या यशस्वी जैस्वाल आणि मॅडी हॅमिल्टनचा नावाच्या मुलीचा फोटो व्हायरल होत आहे.
मॅडी हॅमिल्टन यशस्वीची गर्लफ्रेंड असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. परंतु या दोघांच्या नात्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मॅडी हॅमिल्टन ही यूकेची रहिवासी आहे आणि ती बऱ्याचदा सुट्ट्यांमध्ये यशस्वी जैस्वालसोबत दिसत असते. दोघांचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यशस्वी जैस्वालची आतापर्यंतची कामगिरी- यशस्वी जैस्वालचा कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. यशस्वी जैस्वालने छोट्या कारकिर्दीत अनेक मोठ्या खेळी खेळल्या आहेत. या वर्षी तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू आहे.
बांगलादेशविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जैस्वालने 9 कसोटी सामन्यांच्या 16 डावात 1028 धावा केल्या आहेत, तर एकदाही नाबाद राहून 3 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्या नावे 3 शतकांमध्ये 2 अर्धशतके आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 214 आहे.