Harry Brook Century : चौकार-षटकारांचा पाऊस अन् हॅरी ब्रूकने इंग्लंडची लाज वाचवली! न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकले शतक
England vs New Zealand 1st ODI : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात माउंट माउंगानुई येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे.

Harry Brook Century : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात माउंट माउंगानुई येथे पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली, पण सुरुवात अतिशय खराब झाली. केवळ 33 धावांवर इंग्लंडचा अर्धा संघ तंबुत गेला. मात्र, त्यानंतर हॅरी ब्रूकने मैदानात अक्षरशः धुमाकूळ घातला आणि इंग्लंडचा डाव सावरला. एकवेळ 33/5 वर असलेला संघ त्यांने 223 धावांपर्यंत नेला. ब्रूक 35.2 षटकात बाद झाला, पण त्याआधी त्याने 101 चेंडूंमध्ये 135 धावा ठोकल्या, ज्यात 9 चौकार आणि तब्बल 11 षटकारांचा समावेश होता.
ब्रूकने अनेक मोठे विक्रम केले नावे
या झंझावाती खेळी दरम्यान ब्रूकने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले. तो इऑन मॉर्गननंतर एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा इंग्लंडचा दुसरा कर्णधार ठरला आहे. तसेच एका वनडे डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या इंग्लंडच्या चौथ्या फलंदाजाच्याही यादीत त्याचा समावेश झाला आहे.
A monster 💯 from the captain gives us a fighting chance.
— England Cricket (@englandcricket) October 26, 2025
He scores 1️⃣3️⃣5️⃣ in our total of 2️⃣2️⃣3️⃣ pic.twitter.com/7k24Gvd73l
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. पण सुरुवातीला मोठा धक्का बसला, केवळ 10 धावांवर 4 गडी बाद झाले. त्यानंतर स्कोर झाला 56/6. एका टोकावर विकेट्स पडत असताना, दुसऱ्या टोकावर ब्रूक ठामपणे उभा राहिला आणि 101 चेंडूंवर 135 धावा ठोकल्या. त्याने एकूण 20 चौकार-षटकारांची फटकेबाजी केली. जेमी ओव्हर्टननेही (46) चांगली साथ दिली आणि दोघांनी मिळून सातव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. त्यांच्याशिवाय इतर कोणताही इंग्रजी फलंदाज द्विशतकी आकडा पार करू शकला नाही.
सलग तीन षटकार अन् ठोकले शतक
ब्रूकने शेवटच्या विकेटसाठी 57 धावा केल्या आणि 82 चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतरही त्याने चार षटकार झळकावले, पण मिशेल सॅन्टनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. इंग्लंडचा डाव 223 धावांवर संपुष्टात आला. ही ब्रूकची एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरी शतकी खेळी ठरली. तसेच, एका डावात 10 पेक्षा जास्त षटकार ठोकणारा तो इंग्लंडचा फक्त दुसरा कर्णधार ठरला.
🚨 HARRY BROOK SMASHED ONE OF THE ICONIC ODI HUNDREDS EVER 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) October 26, 2025
- England were 10/4 to 56/6 and then Brook smashed Hundred from just 82 balls by the Captain. 🤯 pic.twitter.com/Zj8y4mXbbK
वनडे करिअरमधील दुसरे शतक
हॅरी ब्रूकच्या करिअरमधील हे दुसरे वनडे शतक ठरले. आत्तापर्यंत त्याने 33 वनडे सामन्यांत 38.96 च्या सरासरीने 1130 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतके आणि 6 अर्धशतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 30 सामन्यांच्या 50 डावांत 57.55 च्या सरासरीने 2820 धावा केल्या असून 10 शतके आणि 13 अर्धशतके झळकावली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ब्रूकने 52 सामन्यांत 30.66 च्या सरासरीने 1012 धावा केल्या असून 5 अर्धशतके त्याच्या नावावर आहेत.
हे ही वाचा -
Sarfaraz Khan : टीम इंडियात स्थान मिळवण्यात सरफराज खानचा धर्म आडवा आला? निवड समितीच्या माजी प्रमुखाने स्पष्टच सांगितलं...





















