एक्स्प्लोर

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरची ऐतिहासिक कामगिरी, 'हा' सन्मान मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

Harmanpreet Kaur : क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 2022 सन्मान मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेटपटू आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हरमनप्रीत कौरला विशेष सन्मान देण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरला विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 2022 (Wisden T20I player of 2022) च्या यादीत स्थान मिळालं आहे. ऐतिहासिक बाब म्हणजे हरमनप्रीत कौर विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर 2022 सन्मान मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. हरमनप्रीतने 111 चेंडूत केलेल्या शानदार 143 धावांच्या खेळीमुळे भारताला 1999 पासून इंग्लंडमध्ये पहिली एकदिवसीय मालिका जिंकता आली. यामुळेच तिला या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

'हा' सन्मान मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) विस्डेनच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंच्या यादीत (Wisden Cricketers of the Year) नाव मिळविणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचला. 1889 सालापासून विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर ही यादी प्रकाशित केली जाते. जगभरातील क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा या यादीत समावेश केला जातो. या यादीत जगभरातील इतर ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात न्यूझीलंडचे (New Zealand) टॉम ब्लंडेल (Tom Blundell) आणि डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) तसेच इंग्लंडचे England) बेन फोक्स (Ben Foakes) आणि मॅथ्यू पॉट्स (Matthew Potts) या खेळाडूंनाही मान मिळाला आहे.

सुर्यकुमार यादवचाही यादीत समावेश

सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या आणखी एका भारतीय खेळाडूला देखील हा सन्मान मिळाला आहे. सुर्यकुमारने गेल्या वर्षभरात त्याच्या अप्रतिम कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आले. सूर्यकुमार यादवला विस्डेन T20I क्रिकेटर ऑफ द इयर पुरुष म्हणून निवडण्यात आलं. 2022 मध्ये, सुर्यकुमारने एका वर्षात 1000 टी20 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याने नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध आणि माउंट मौनगानुई येथे न्यूझीलंडविरुद्ध दोन शतके ठोकली. त्याने या सर्व धावा 187.43 च्या स्ट्राइक रेटने केल्या आणि मधल्या फळीत फलंदाजी करताना हे त्याची ही खेळी अतुलनीय आहे. त्यामुळे त्याला हा सन्मान देण्यात आला आहे.

बेथ मुनी जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाची (Australia) फलंदाज बेथ मुनी (Beth Mooney) हिला तीन वर्षात दुसऱ्यांदा जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (World's Top Women's Cricketer) म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. तिले ऑस्ट्रेलियाला 50-ओव्हर आणि 20-ओव्हरच्या स्पर्धांमध्ये विश्वचषक जिंकून दिलं आणि 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) सुवर्णपदक जिंकलं.

बेन स्टोक्सला 'जगातील आघाडीचा क्रिकेटर'

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला (England Captain Ben Stokes) 'जगातील आघाडीचा क्रिकेटर' (Leading Cricketer in the World Male) म्हणून गौरविण्यात आले. या 31 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने इंग्लंडला 10 कसोटी सामन्यांत नऊ विजय मिळवून दिला आणि नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या T20 विश्वचषक अंतिम विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या एप्रिलमध्ये स्टोक्सची कर्णधारपदी नियुक्ती होण्यापूर्वी इंग्लंडला त्यांच्या मागील 17 कसोटींमध्ये फक्त एकच विजय मिळवता आला होता. त्यामुळे या कामगिरीसाठी त्याचा गौरव करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेटHingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP MajhaRahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
Embed widget