मुंबई : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला न्यूझीलंड दौऱ्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. पाठीवरच्या शस्त्रक्रियेतून तो अजूनही सावरला नाही आहे. बीसीसीआयने शनिवारी हार्दिक पंड्याला बाहेर जाण्याच्या वृत्ताला पुष्ठी दिली आहे. “न्यूझीलंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही. त्याच्या पाठीच्या दुखापतीवर पुढील उपचार घेण्यासाठी तो लंडनला जाणार आहे.” बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

तसेच पंड्या अद्यार पाठीवरच्या शस्त्रक्रियेतून सावरला नसल्याचं निदान लंडनचे डॉ. जेम्स अॅलिबोन यांनी केलं आहे. त्यांनी पंड्याला फिटनेसवर आणखी मेहनत घेण्याचा सल्ला दिला आहे. एनसीएचे फिजियो डॉ. आशीष कौशिक यांच्यासोबत पंड्यानं नुकतीच अॅलिबोन यांची लंडनमध्ये भेट घेतली होती.

आशिया चषकादरम्यान हार्दिक पांड्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिकने काही महत्वाच्या मालिकाही खेळल्या. मात्र 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत हार्दिकची पाठीची दुखापत पुन्हा एकदा सुरु झाली. त्यानंतर हार्दिक संघाबाहेर गेला, तो अद्याप कमबॅक करु शकलेला नाही. काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये हार्दिक पांड्याच्या पाठीवर शस्त्रक्रीया करण्यात आलेली होती. यानंतर बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यावर बीसीसीआयचे डॉक्टर आणि फिजीओ यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु होते.

संबंधित बातम्या : 

हार्दिक-नताशाच्या साखरपुड्याच्या बातमीने धक्का बसला : हार्दिकचे वडील


हार्दिक पंड्याला क्लिन बोल्ड करणारी 'नताशा' आहे तरी कोण?