एक्स्प्लोर

ग्रेग चॅपलच्या नजरेत विराट कोहली कसा होता? प्रत्येक क्रिकेटप्रेमीला भारावून टाकणारं वर्णन!

Greg Chappell on Virat Kohli : भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी विराट कोहलीच्या कारकीर्दीचं वर्णन केलंय.

Greg Chappell on Virat Kohli : टीम इंडियाचा अँग्री यंग मॅन विराट कोहलीने (Virat Kohli) टी -20 पाठोपाठ आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला आहे. विराटची महानता त्याचे आकडे दाखवतात, पण विराट खेळाडू म्हणून कसा होता, याची झलक त्याची मैदानातील सर्वसमावेशकता आणि 100 टक्के योगदान दाखवून देतं. विराटचं कसोटी क्रिकेट, विराटची महानता नेमकी कशी होती, विराट हा या दशकातील सर्वोत्तम खेळाडू कसा होता, हे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल (Greg Chappell) यांनी त्यांच्या शब्दात मांडलं आहे. 

ग्रेग चॅपल नेमकं काय म्हणाले? 

ज्वालामुखीसारख्या धगधगत्या युगाचा अंत

"विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती ही केवळ एका कारकिर्दीचा अंत नाही, तर एका ज्वालामुखीसारख्या धगधगत्या युगाचा अंत आहे. असा ज्वालामुखी ज्यामध्ये जिद्द होती, आक्रमकता होती आणि आत्मविश्वास होता.  भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर सर्वात मोठा बदल घडवणारा खेळाडू जर कोणी असेल, तर तो विराटच. काही बाबतीत त्याने सचिनलाही मागे टाकलं. विशेषतः भारतीय क्रिकेटची मानसिकता विराटने बदलून टाकली.  विराट केवळ धावा करणारा फलंदाज नव्हता, तो भारतीय क्रिकेटचा धडकी भरवणारा, धगधगता आत्मा होता.

त्याने केवळ भारतीय क्रिकेटचा खेळ बदलला नाही, तर भारतीय क्रिकेटची मानसिकताच बदलून टाकली. आत्मविश्वासाने भरलेली, कोणालाही न घाबरणारी, कोणापुढेही न झुकणारी भारतीय क्रिकेटची प्रतिमा त्याने निर्माण केली. दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या कोहलीने केवळ धावा केल्या नाहीत, त्याने अपेक्षांची परिभाषाच बदलली, चालत आलेल्या परंपरांना आव्हान दिले आणि 21 व्या शतकातील आत्मविश्वासू, निःस्वार्थ भारताचे प्रतिक म्हणून काम केले. त्याच्या निवृत्तीने केवळ आकडेवारीची पोकळी  निर्माण झाली असं नाही तर भारतीय क्रिकेट संघाच्या उर्जेवरही परिणाम झाला. कारण त्याच्यासारखा दुसरा खेळाडू कोणीच नाही. 

विराटने आक्रमकतेची आग पेटवली कधी काळी भारतीय क्रिकेट संघा परदेशात दडपणात खेळायचा. भारतीय संघ  तांत्रिकदृष्ट्या सक्षम असला तरी त्या संघात आत्मविश्वास कमी असायचा. मात्र सौरव गांगुलीनं हे चित्र बदललं आणि भारतीय संघाला नवा कणा आणि नवा बाणा दिला. मग कॅप्टन धोनीने त्याच्या कूल नेतृत्त्वात टीम इंडियाला मर्यादित षटकांमध्ये मोठं यश मिळवून दिलं. पण विराट??? विराट कोहलीने भारतीय संघात आक्रमकतेची आग पेटवली. विराटने जुना इतिहास पुसला आणि स्वत: नवा इतिहास लिहायला घेतला. जिथे भारत केवळ ‘मॅच खेळतो’ नव्हे, तर ‘मॅच जिंकतो’ अशी अपेक्षा असते. 

विराट कोहली हा ऑस्ट्रेलियन नसलेला, भारतीय "ऑस्ट्रेलियन" खेळाडू होता, सफेद कपड्यातील वॉरियर. असा योद्धा जो प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडला, कधीही मागे हटला नाही, बॅटिंग, फिल्डिंग आणि वेळ पडल्यास बोलिंग अशा प्रत्येक गोष्टीत 100  टक्के देणारा योद्धा. स्वत: 100 टक्के देताना तो इतरांनीही शंभर टक्केच द्यायला हवेत यासाठी आग्रही असणारा योद्धा.   कोहलीच्या टेस्ट कारकिर्दीतील दोन मालिका त्याची महानता आणि त्याची समर्पकतेची उदाहरणं आहेत. एक आहे 2014 ची इंग्लंडमधील पराभवाची आणि दुसरी आहे २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात मिळवलेली ऐतिहासिक मालिका विजयाची.

2014 मध्ये इंग्लंडमध्ये जेम्स अँडरसनने विराटच्या कमकुवत बाजूंना उघडं पाडलं. पण अपयश हे विराटसाठी राख होती, त्या राखेतून विराटने फिनिक्स भरारी घेतली. विराटने आपल्या कमकुवत बाबींवर काम केलं, तो परत कामाला लागला, सराव करत राहिला.  त्यासाठी त्याने आपल्या जुन्या प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेतलं, सचिनकडून सल्ला घेतला, आणि स्वतःला नव्यानं घडवलं. 2018 मध्ये त्याच इंग्लंडच्या भूमीवर, त्याने 593 धावा ठोकत, चार वर्षापूर्वीचं अपयश धुवून तर काढलंच, पण नवा मॅच्युर कोहली जगाला पाहायला मिळाला. 

2018 मध्ये इंग्लंडमध्ये त्याचे पुनरागमन हे एक अद्भुत कथानक होते. एजबॅस्टनच्या पहिल्या कसोटीत कोहलीने तुफानी 149 धावा केल्या. ज्या आऊडसाईड ऑफ स्टम्पवर विराट बाद होत होता, त्याच चेंडूंवर तो चौकार ठोकू लागला.  विराटचे दुसऱ्या डावातील अर्धशतकही कमी मौल्यवान नव्हते. पाच कसोटी सामन्यांमध्ये, त्याने ५९.३० च्या सरासरीने ५९३ धावा केल्या, जो दीर्घकाळात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.    

विराटच्या राज्याभिषेकाची भूमी

मग ऑस्ट्रेलिया मालिका ही तर विराटच्या राज्याभिषेकाची भूमी होती. भारताने कधीही ऑस्ट्रेलियात टेस्ट मालिका जिंकलेली नव्हती. पण विराटच्या नेतृत्वाखालील संघानं ते करून दाखवलं. त्याची 123 धावांची खेळी ही अत्यंत कठीण खेळपट्टीवर केलेली लाजवाब खेळी होती. कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च जिद्द आणि शिस्तीचं प्रतीक होती. त्यानंतर तो टीम इंडियाचा कर्णधार बनला होता. 

विराट कोणत्याही मालिकेसाठी केवळ फिटनेस किंवा शरीरानेच नव्हे, तर इमॅजिनेशन अर्थात कल्पनाशक्तीनेही तयार व्हायचा. इतर खेळाडू परिस्थिती घडल्यावर प्रतिसाद देत, पण कोहली आधीच ते ओळखायचा. डाव सुरू होण्यापूर्वीच तो त्याची कल्पना करायचा. दबाव येण्याआधीच तो त्या अनुभवून गेलेला असायचा. हेच होतं त्याचं खऱ्या अर्थाने ‘सुपरपॉवर’.

त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी म्हणजे केवळ धावा नव्हे, त्या एक स्टेटमेंट असायच्या. अ‍ॅडलेडमधील १४१, सेंच्युरियनमधील १५३, वेस्ट इंडिजमधील २००, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं २५४* — ह्या सगळ्यांनी त्याच्या फलंदाजीची विविध रूपं दाखवली. तो ‘Feel’वर खेळणारा फलंदाज होता. टायमिंग शॉट, स्ट्रोक, सरळ बॅटने खेळलेले ड्राइव्हसने त्यांच्या तंत्राला सौंदर्याची जोड दिली. साचेबद्ध नवनवीन फटके त्याच्या खेळात नव्हते, पण त्याचं पारंपरिक तंत्र युद्धाच्या आवेशात उतरायचं.

तो "फील"वर खेळणारा फलंदाज होता – ताकदीनं नव्हे तर अचूक टाइमिंगवर त्याचा भर असायचा. जड बॅट्स कधीच त्याला आवडल्या नाहीत. त्याऐवजी तो दोन्ही हातांनी, टेनिससारखी आक्रमकता घेऊन स्लो पिचवर खेळायचा, ज्यामुळे त्याचे स्ट्रेट ड्राइव्हसुद्धा दुसऱ्या जगातून आलेल्या शॉटसारखे भासत. त्याला क्वचितच नविन प्रयोगांची गरज पडायची – ना स्कूप्स, ना रिव्हर्स स्वीप्स. त्याचं खरं कौशल्य होतं पारंपरिक तंत्राला रणांगणातील जिद्दीशी एकत्र जुळवण्याचं.

वडिलांच्या मृत्यूनंतरही मैदानात उभा राहिला

कोहलीची मानसिक तयारी ही एक अद्भुत गोष्ट होती. वैयक्तिक असो वा व्यावसायिक, प्रत्येक अपयशानंतर तो पुढे गेला आणि अधिक कणखर, अधिक लक्ष्यभेदी आणि अधिक मॅच्युअर होत गेला. २००६ मध्ये रणजी सामन्यादरम्यान त्याच्या वडिलांचे निधन हा एक निर्णायक क्षण राहिला. मात्र त्यावेळी त्याने माघार घेतली नाही. त्याने फलंदाजी केली आणि एका अटीतटीच्या डावात ९० धावा केल्या - कारण त्याच्या वडिलांना तेच हवे होते.  

२००८ मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कप विजेता कर्णधार म्हणून तो क्रिकेट जगाताला परिचीत झाला. अनेकांना वाटलं की याचा दिखावा फार काळ टिकणार नाही. पण त्यानं हे सगळं चुकीचं ठरवलं — कठोर प्रामाणिकपणाने, नवे बदल स्वीकारत तो पुढे जात राहिला. त्याने आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल केले — आहार, फिटनेस, मानसिक तयारी. आणि त्याचं रूपांतर एका आधुनिक भारतीय क्रिकेटपटूत झालं — व्यावसायिक दृष्टिकोन असलेला, अत्यंत तंदुरुस्त, आणि मानसिकदृष्ट्या अजोड क्रिकेटर.

विराट कोहली म्हणजे नव्या भारताचं प्रतिबिंब होता — जागतिक विचारसरणी असलेला, पण आपल्या मुळांशी घट्ट जोडलेला. त्याचं स्टारडम आणि आयपीएलचा उदय एकाच वेळी घडलं, पण त्याने कधीच टेस्ट क्रिकेटचं महत्त्व कमी होऊ दिलं नाही.

सचिन हा प्रतिभेचा अवतार होता, धोनी मास्टर टॅक्टिशियन — पण विराट? तो स्वत:च एक प्रभाव होता.

यो यो टेस्ट 

कारण त्याने केवळ विजय मिळवले नाहीत तर त्याने क्रिकेटची मानसिकता बदलली. त्याने फास्ट बॉलिंगला भारताचं शस्त्र बनवलं. ‘यो-यो टेस्ट’ भारतीय क्रिकेट संस्कृतीत आणलं. आपल्याच गोलंदाजांवर विश्वास दाखवला, स्पर्धकांना भिडला, आणि दुसऱ्या क्रमांकासाठी कधीही खेळला नाही. टेस्ट क्रिकेट टिकावं, प्रबळ व्हावं — यासाठी तो झगडला.

२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये, स्टिव्ह स्मिथवर टीका करणाऱ्या चाहत्यांना समजावण्याचा त्याचा प्रयत्न — ही एक थेट ‘राजनैतिक पातळीवरची’ कृती होती. तो तापट होता, पण तरीही तो क्रिकेटचं ‘सुपर-इगो’ बनला.

आज तो टेस्ट क्रिकेटमधून बाहेर पडतो आहे, मागे ठेवतो आहे एक सुवर्णमय कारकीर्द — ९००० हून अधिक धावा, ३० शतकं, परदेशातील ऐतिहासिक  विजय. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो एक ‘ब्लूप्रिंट’ देऊन जातो आहे — कसोटी क्रिकेट कसं खेळायचं, अभिमानाने, जिद्दीने आणि मनापासून, अशी ती ब्लू प्रिंट आहे.

तो डौलात चालला, कधीकधी मोठ्याने बोलला, कायम मनापासून खेळला. आणि याच कारणांमुळे तो त्या भारताचं प्रतीक ठरला — जो आता केवळ सहभागी व्हायला नव्हे, तर जिंकण्यासाठीच आलेला असतो.

विराट कोहली — एका नव्या भारताचा आवाज.

विराट कोहली किंग होता, त्याचं राज्य आता संपलं असेल, पण त्याचा प्रभाव, त्याचं तेज कायम राहील

 किंग कोहलीला सलाम आणि धन्यवाद विराट,  यश आणि सन्मान एकत्र नांदू शकतात याचा आम्हाला विश्वास देण्यासाठी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Embed widget