नवी दिल्ली : राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) जागी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची नियुक्ती करण्यात आली आहे. गौतम गंभीरच्या सपोर्ट टीममध्ये  कुणाला संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग कोच कोण असणार याबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही. एका रिपोर्टनुसार दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्कल याचं नाव बॉलिंग कोच म्हणून चर्चेत आहेत. गोलंदाजी प्रशिक्षणाचा चांगला अनुभव मोर्ने मॉर्कलच्या (Morne Morkel) नावावर आहे. याशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) आणि एल. बालाजी यांची नावं देखील सुरुवात चर्चेत होती. आता गंभीरच्या नेतृत्त्वात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.


क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, गौतम गंभीरनं गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्कलच्या नावावर विचार करण्याची विनंती केली आहे. मॉर्कल टीम इंडियाचा बॉलिंग कोच व्हावा,अशी गंभीरची इच्छा आहे.यासंदर्भात मॉर्कल सोबत चर्चा देखील झाल्याची माहिती आहे.  


गंभीरआणि मॉर्कल या दोघांनी लखनौ सुपर जायंट्ससाठी सोबत काम केलं आहे. गौतम गंभीर दोन वर्ष लखनौच्या संघाचा मेंटॉर होता. मॉर्कल अजूनही लखनौचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.  


मॉर्कलनं यापूर्वी पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हमून देखील काम केलं आहे. 2023 मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये मॉर्कल पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. त्या स्पर्धेनंतर मॉर्कलनं राजीनामा दिला होता.  


झहीर खान, बालाजीचं नाव चर्चेत 


मॉर्कलच्या नावाशिवाय भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान, एल. बालाजी, विनयकुमार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. बीसीसीआयकडून या नावांवर देखील विचार केला जात आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.  


मॉर्कलचं आंतरराष्ट्रीय करिअर


मोर्ने मॉर्कलने 2006 ते 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी त्यानं  86 कसोटी, 117 वनडे आणि 44 टी20 इंटरनॅशनल मॅच खेळल्या आहेत.कसोटी त्यानं 309 विकेट काढल्यात. यामध्ये 110 धावांवर 9 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.  वनडे मध्ये त्यानं 25.32 च्या सरासरीनं 188 आणि टी20 इंटरनॅशनल मॅचेसमध्ये 47 विकेट घेतल्या. 


संबंधित बातम्या :