Usain Bolt: उसेन बोल्ट अतिप्रचंड वेगात झाला कंगाल! खात्यातून तब्बल 98 कोटी गायब
Usain Bolt: जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट अचानक कंगाल झालाय. त्याची आतापर्यंतची कमाई आणि रिटायरमेंटनंतर मिळालेला पैसा एका क्षणात गायब झाला
Olympian Usain Bolt: 'फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ' अशी कीर्ती असलेला धावपटू उसेन बोल्ट (Usain Bolt) अचानक कंगाल झालाय. त्याची आतापर्यंतची कमाई आणि रिटायरमेंटनंतर मिळालेला पैसा एका क्षणात गायब झाला आहे. लंडनपासून ते बिजिंग ऑलम्पिकपर्यंत उसेन बोल्ट यानं अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. जगातील सर्वात वेगवान धावपट्टू म्हणून बोल्टला ओळखलं जातं. याच बोल्टची संपत्ती एका क्षणात नाहीशी झाली आहे.
उसेन बोल्टने ऑलम्पिकमध्ये आठ वेळा गोल्ड पदकावर नाव कोरले. त्यानं आतापर्यंत केलेली कमाई आणि निवृत्तीनंतर मिळाले पैसे एका झटक्यात फुर्रर्र झाले आहेत. एका रिपोर्ट्सनुसार बोल्टचे 98 कोटी रुपये गायब झाले आहेत. वकिलांनी त्यांना याबाबत गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.
उसेन बोल्टच्या इनव्हेस्टमेंट खात्यावरुन तब्बल 98 कोटी रुपये गायब झाले आहेत. उसेन बोल्टचं हे खातं स्टॉक्स अॅण्ड सिक्योरिटीज लिमिटेड (SSL) कंपनीसोबत होतं.असोशिएएट प्रेसनुसार, ही जमैका येथील एक गुंतवणूक कंपनी आहे. या कंपनीला बोल्टच्या वकिलांनी पत्र पाठवत पैसे परत करण्यास सांगितलं आहे. वकिलाने पत्रात म्हटलेय की, आमच्यासोबत चोरी अथवा फसवणुकीचा प्रकार झालाय.
गुन्हा दाखल करण्याचा सल्ला -
11 जानेवारी 2023 रोजी उसेन बोल्टला आपल्या खात्यातील फंड गायब झाल्याचं समजलं. मागील बुधवारी त्याच्या वकिलाने कंपनीकडे या पैशांची मागणी केली. वकील म्हणाले की,' जर दहा दिवसांच्या आतमध्ये कंपनीने पैसे माघारी केले नाहीत, तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.' अन्य एका रिपोर्ट्सनुसार, वकिलांनी कंपनीला आठ दिवसांचा वेळ दिला आहे. जर कंपनीने निर्धारित वेळेत पैसे माघारी दिले नाहीत, तर बोल्ट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. बोल्टच्या खात्यात जवळपास 12.8 मिलिअन डॉलर इतकी रक्कम होती. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, बोल्टच्या खात्यात आता फक्त 12 हजार डॉलर इतकीच रक्कम बाकी आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत कंपनीनं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण जर निर्धिरित वेळेत कंपनीनं पैसे परत केले नाहीत, तर गुन्हा दाखल करण्याचा सल्ला वकिलाने बोल्टला दिला आहे.
बोल्टचं करिअर -
बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये दोन वैयक्तिक सुवर्णपदकं जिंकून बोल्टनं क्रीडा विश्वात धमाका केला होता. सहा ऑलिम्पिक गोल्ड आणि 11 विश्वविजेतेपदं आतापर्यंत बोल्टच्या नावावर जमा आहेत. 9.58 सेकंदात 100 मीटर, तर 19.19 सेकंदात 200 मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही बोल्टने 2009 च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील 100 मीटर, 200 मीटर आणि 4 X 100 मीटर रिले अशा प्रत्येक प्रकारात 2011, 2013 आणि 2015 अशी सलग तीन वर्ष त्याने सुवर्णपदकांची कमाई त्याने केली. (अपवाद 2011 मधील 100 मीटर स्पर्धेचा) 2012 च्या लंडन आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने तीन-तीन सुवर्णपदकं कमावली आहेत.
आणखी वाचा:
IND vs NZ : न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट
शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली!