Eng vs Ind 4th Test : 'खेळाडूच्या वयाकडे पाहू नका...', करुण नायरवर भडकला दिग्गज भारतीय खेळाडू, संघातून हकालपट्टीची केली मागणी, जाणून घ्या काय म्हणाला?
Farokh engineer on Karun Nair : टीम इंडियाच्या माजी दिग्गज खेळाडूने करुण नायरच्या कामगिरीवर जोरदार टीका केली आहे.

England vs India 4th Test Update : भारताचे माजी यष्टिरक्षक फलंदाज फारुख इंजीनियर यांनी करुण नायरच्या कामगिरीवर जोरदार टीका केली आहे. तब्बल 3000 दिवसांनंतर करुणने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं होतं. घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली, पण इंग्लंडमध्ये तो काही खास करू शकला नाही.
करुण नायरची आतापर्यंतची कामगिरी
भारत-इंग्लंड टेस्ट मालिकेतील 3 सामन्यांमध्ये करुणने सुमारे 22 च्या सरासरीने फक्त 131 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोर 40 धावांचा राहिला आहे. काही डावांमध्ये त्याला चांगली सुरुवात मिळाली, पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे फारुख इंजीनियर त्याच्या कामगिरीवर नाराज आहेत.
इंजीनियर काय म्हणाले?
इंजीनियर म्हणाले, "करुण नायर 20-30 धावा करत आहे. त्याने सुंदर कवर ड्राइव्ह्स मारल्या, पण नंबर 3 च्या फलंदाजाकडून फक्त सुंदर 30 धावांची अपेक्षा नसते. त्याने 100 धावांची खेळी खेळली पाहिजे, मग ती खेळी फारशा सुंदर शॉट्सची नसली तरी चालेल. पण बोर्डवर मोठ्या धावा लागतात."
"भारताने सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड केली पाहिजे" – इंजिनियर
करुणच्या कमजोर कामगिरीनंतर इंजीनियर यांनी टीम इंडियाला सल्ला दिला की, साई सुदर्शनच्या वयाकडे पाहू नका. जर तो चांगला खेळाडू असेल, तर मँचेस्टर टेस्टसाठी त्याला संधी द्यावी.
ते म्हणाले, "आपण देशासाठी खेळतो आहोत. प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. म्हणून मी म्हणेन, वय विसरून जा. जर साई सुदर्शन चांगला असेल, तर त्याला मँचेस्टर टेस्टमध्ये खेळवा. संघात सध्या सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडायला हवेत." तसे पाहायला गेलं तर, फारुख इंजीनियर यांनी करुण नायरवर नाराजी व्यक्त करत त्याला संघातून वगळण्याची अप्रत्यक्ष मागणी केली आहे. त्याचबरोबर साई सुदर्शनला संधी देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी 18 खेळाडूंचा भारतीय संघ -
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, ऋषभ पंत (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.
हे ही वाचा -





















