BCCI Pension Increase Of Former Cricketers: बीसीसीआयने माजी क्रिकेटपटू आणि माजी अधिकाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माजी खेळाडूंच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. यामध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटशी संबंधित 900 जणांचा समावेश करण्यात आला आहे. या माजी खेळाडूंना लवकरच या पेन्शनचा लाभ मिळू लागेल.


बीसीसीआय जय शाह यांनी ट्वीट केले की, "माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. सुमारे 900 लोकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे 75 टक्के कर्मचाऱ्यांना 100 टक्के वाढीचा लाभ घेता येणार आहे.






पेन्शन वाढीबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, क्रिकेट बोर्डाने माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या आर्थिक स्थितीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणाले, "आपल्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक स्थितीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांचे खेळण्याचे दिवस संपले की त्यांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे.''


बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमल म्हणाले, "आज बीसीसीआय जे काही आहे, ते तिच्या माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या योगदानामुळे आहे. मासिक पेन्शनमध्ये वाढ जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे, जी आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या भल्यासाठी असेल."


इतर महत्वाच्या बातम्या: 


IPL Media Rights Auction : बीसीसीआयची चांदीच-चांदी; 44 हजार कोटींच्या घरात विकले गेले मीडिया राईट्स, एका सामन्यातून 100 कोटींहून अधिकची होणार कमाई
Nupur Sharma News : नुपूर शर्मा प्रकरणावर क्रिकेटपटूंनीही दिली प्रतिक्रिया, शोएब अख्तर म्हणाला...